Hair Care Tips Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Hair Care Tips: केस धुतल्यानंतर डोक्याला टॉवेल बांधणे धोकादायक! 'ही' चूक कधीही करू नका

अनेक महिला या केस धुतल्यानंतर केसांभोवती टॉवेल बांधतात.

दैनिक गोमन्तक

Hair Care Tips: टक्कल पडणे, केस गळणे, केस ड्राय होणे, कोंडा या आजच्या काळात केसांशी संबंधित सर्व सामान्य समस्या आहेत. तेसच प्रत्येकजण त्याच्याशी संघर्ष करीत आहे. स्त्री असो वा पुरुष, मुलगा असो की मुलगी, प्रत्येकजण आपल्या केसांच्या समस्येपासून मुक्त होण्यासाठी अनेक प्रयत्न करतात.

विशेषतः महिलांचे केस लांब असतात. यामुळे त्यांना केसांची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. तुम्ही घरी किंवा नातेवाईकांमध्ये अनेकदा पाहिले असेल की विशेषतः महिला केस धुतल्यानंतर डोक्याभोवती टॉवेल बांधतात.

जर तुम्ही कोणत्याही महिलेला विचारले की ती असे का करते, तर तुम्हाला सरळ उत्तर मिळेल की केस लवकर सुकतात, म्हणूनच ती असे करते. डॉक्टर नेहमीच असे करण्यास नकार देतात. डॉक्टरांच्या मते, असे कधीही करू नये कारण ओल्या केसांवर टॉवेल गुंडाळल्याने केसांचे आरोग्य खराब होउ शकते.

केस धुतल्यानंतर टॉवेल गुंडाळल्याने केसांना खूप नुकसान होते. ज्या महिला किंवा मुली टॉवेल बांधतात, त्यांनी असे करण्याऐवजी केस धुतल्यानंतर लगेच हेअर ड्रायर वापरून केस सुकवले तर अधिक फायदा होईल. 

यामुळे केस (Hair) लवकर कोरडे होतील आणि तुमची स्कॅल्पही निरोगी राहील. हेअर ड्रायर वापरताना नेहमी काळजी घ्यावी. कधीही केसांमध्ये शॅम्पूचा वापर आठवड्यातून 2-3 वेळाच करावा. लांब केस जास्त धुण्याने खूप नुकसान होते. 

  • केस धुल्यानंतर टॉवेल गुंडाळण्याचे 5 तोटे

ओल्या केसांवर टॉवेल गुंडाळल्याने डोके बराच वेळ ओले राहते, त्यामुळे कोंडा होण्याची शक्यता अधिक वाढते. 

केस धुतल्यानंतर टॉवेल गुंडाळल्याने टाळूमध्ये बुरशीजन्य संसर्ग होतो. यामुळे केसांचे आरोग्य खराब होउ शकते.

ज्या लोकांना केस गळण्याची समस्या असते त्यांनी चुकूनही ओल्या केसांना टॉवेल गुंडाळू नये. कारण यामुळे समस्या वाढू शकतात. 

Hair Care tips

ओल्या केसांना टॉवेल बांधल्याने केसांची मुळे कमकुवत होतात तसेच केस गळण्याची समस्याही वाढते. 

टॉवेल बांधल्याने केस लवकर कोरडे होतात आणि केसांची नैसर्गिक चमक कमी होते. 

आठवड्यातून 2-3 वेळा केसांना तेलाने मसाज करावी.

यामुळे तुमच्या केसांची नैसर्गिक चमक कायम राहील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT