Breakfast Recipe Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Breakfast Recipe: रविवारची करा हेल्दी सुरूवात, ब्रेकफास्टमध्ये बनवा पालक उत्तपम

पालकाचे सेवन आरोग्यासाठी फायदेशीर असते.

दैनिक गोमन्तक

Healthy Breakfast Recipe:  अनेकदा सकाळी नाश्त्यात काय बनवावे हे समजत नाही. मुले हेल्दी भाज्या खाण्यास कंटाळा करतात. विशेषतः जेव्हा पालक खाण्याची वेळ येते. पालकाची भाजी म्हटली की मुलं त्यापासून दूर पळतात.

पण ही हेल्दी भाजी फायदेशीर आहे. मुलांसह कुटुंबातील सर्व सदस्यांना पालक खायला द्यायचा असेल तर नाश्त्यात पालक उत्तपम बनवा. पालकाचे सर्व गुणधर्मही मिळतील आणि चवीला टेस्टीही लागेल.

ही रेसिपी झटपट तयार होते आणि मेहनत लागत नाही आणि काही मिनिटांत तयार होते. चला तर मग जाणून घेऊया पालक उत्तपम बनवण्याची रेसिपी.

  • पालक उत्तपम बनवण्यासाठी लागणारे साहित्य

- एक वाटी रवा,

- अर्धी वाटी दही,

- पालक 100 ग्रॅम

- एक टीस्पून मोहरी

- अर्धा चमचा जिरे

- दोन हिरव्या मिरच्या

- मीठ चवीनुसार

  • पालक उत्तपम बनवण्याची कृती

पालक उत्तपम बनवण्यासाठी पहिले पालक पाण्यात उकळून घ्यावे. नंतर हा पालक बारीक करून त्याची पेस्ट तयार करा. एका मोठ्या भांड्यात रवा घ्या आणि त्यात दही घाला. चांगले मिक्स करा आणि सुमारे अर्धा तास बाजूला ठेवा. नंतर त्यात पालक प्युरी घाला आणि आवश्यक असल्यास पाणी घालून गुळगुळीत पेस्ट तयार करा.

  • उत्तपम पेस्ट मध्ये फोडणी घाला

उत्तपमची चव वाढवण्यासाठी त्यात फोडणी घाला. तडक्यासाठी कढईत तेल गरम करून त्यात जिरे टाका. तसेच मोहरी आणि बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या घाला. कढीपत्ता घाला आणि उत्तपम पेस्टमध्ये तडका घाला.

आता ही पेस्ट उत्तपम बनवण्यासाठी तयार आहे. ते बनवण्यासाठी पॅन गरम करा आणि तेल घाला. तव्यावर तयार केलेले बॅटर घाला आणि त्यावर झाकन ठेवा. सुमारे दोन मिनिटे शिजवा.

ते चांगले शिजल्यावर उलटे करून एक मिनिट शिजवा. दोन्ही बाजूने नीट भाजल्यानंतर ते तव्यावरून काढून प्लेटमध्ये ठेवा आणि हिरवी चटणी किंवा नारळाच्या चटणीसोबत गरमागरम सर्व्ह करा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: 'ट्रेनच्या खिडकीतून बाहेर लटकणारे पाय अन्...'; चिमुकलीच्या व्हिडिओनं खळबळ; सोशल मीडियावर थरकाप व्हायरल

Sanjay Dutt Luxury Hotel In Goa: संजय दत्तचं गोव्यात आलिशान लक्झरी हॉटेल, उद्घाटनापूर्वीच रचला इतिहास; आंतरराष्ट्रीय स्तरावर ठरतंय चर्चेचा विषय

Vaidhriti Yoga: ऑफिसमध्ये वाद अन् प्रवासात नुकसान! सूर्य-चंद्राची अशुभ युती उडवणार झोप; वैधृती योग 'या' राशींसाठी ठरणार घातक

Delhi Student Protest: मुलांचा आक्रोश, अमानुष अत्याचार अन् रक्ताळलेलं 'आंदोलन'! शिक्षणातील लाल फितीविरुद्ध 'जेन-झी'चा आरपारचा रणसंग्राम

Anti Defection Law: सत्तेची चिता पेटवण्यासाठी निष्ठेचा बळी? राजकीय पक्षांतराच्या अनैतिक नाट्यावर ताशेरे; आमदार पळवणाऱ्या वृत्तीमुळे प्रादेशिक पक्षांचे अस्तित्व धोक्यात

SCROLL FOR NEXT