Fruits Benefits Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Fruits Benefits: चुकीच्या वेळी फळे खाल्ल्यास शरीरावर होईल वाईट परिणाम

सकाळी रिकाम्या पोटी फळ खाल्यास पोट निरोगी राहते.

दैनिक गोमन्तक

निरोगी आरोग्यासाठी फळांचे सेवन करणे गरजेचे आहे. फळे आरोग्यासाठी किती फायदेशीर आहेत. हृदयविकाराचा धोका कमी करण्याबरोबरच ते रक्तदाबाची पातळी स्थिर ठेवण्यासाठी आणि कर्करोग निर्माण करणाऱ्या पेशींना संरक्षण देण्याचे काम करतात.

फळे (Fruits) खाण्याचे फायदे सगळ्यांनाच माहीत आहेत. बरेच लोक जेवणासोबत फळांचे सेवन करताना दिसतात आणि बरेच लोक रात्रीचे सेवन करतात, ही वेळ यासाठी योग्य नाही. चला जाणून घेऊया फळे खाण्याची योग्य वेळ कोणती आहे.

  • योग्य वेळ कोणती

फळांपासून पोषक तत्त्वे मिळविण्यासाठी फळांची खाण्याची योग्य वेळ माहित असणे आवश्यक आहे. वाईट परिणाम टाळण्यासाठी योग्य प्रमाणात आणि योग्य वेळी त्यांचे सेवन करणे आवश्यक आहे. प्रत्येक फळामध्ये विविध प्रकारचे एन्झाईम आणि ऍसिड असतात, जे आतड्यांतील जीवाणूंशी प्रतिक्रिया देऊ शकतात.

त्याचा माणसावर चांगला किंवा वाईट दोन्ही परिणाम होऊ शकतो. काही लोकांचे म्हणणे आहे की, सकाळी फळे खाण्याची सर्वोत्तम वेळ आहे. त्यांचे म्हणणे आहे की रिकाम्या पोटी फळे खाल्ल्याने पचनक्रिया चांगली राहते, वजन नियंत्रित राहतं आणि शरीर डिटॉक्स होते. तर काही लोक म्हणतात की दुपार ही फळे खाण्यासाठी सर्वोत्तम वेळ आहे.

  • उच्च फायबरयुक्त फळे रिकाम्या पोटी खावी

फळे दुपारी किंवा सकाळी खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी वाढते आणि पचनक्रिया सक्रिय होते. सकाळी रिकाम्या पोटी खाल्लेले फळ आपले पोट व्यवस्थित साफ करण्यास मदत करते.

यामुळे बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते. यामुळे लक्षात ठेवावे की उच्च फायबर असलेली फळे रिकाम्या पोटी खाणे आवश्यक आहे. सकाळी खाण्यासाठी सर्वोत्तम फळांमध्ये टरबूज,पेरू, पपई, डाळिंब, आंबा आणि केळी यांचा समावेश होतो.

नाश्त्यात (Breakfast) फळे खाणे अनेकांना चांगले वाटते. कारण सकाळी खाल्लेले फळ आपल्याला दिवसभर ऊर्जा देते. जर तुम्हाला सकाळच्या नाश्त्यात फळे खायला आवडत असतील तर तुम्ही वेगवेगळ्या फळांना तुमच्या नाश्त्यात समावेश करु शकता.

नाश्त्यामध्ये तुम्ही चेरी, अननस, स्ट्रॉबेरी, किवी आणि सफरचंद या फळांचे सेवन करु शकता. चेरी आणि अननसात दाहक-विरोधी गुणधर्म असतात. ते तुमचा रक्तदाब नियंत्रित करण्यास आणि हृदयविकार (Heart) कमी करण्यास मदत करतात. स्ट्रॉबेरी आणि किवी हे रोगप्रतिकारक (Immunity) शक्ती वाढवणारे आहेत. सफरचंद (Apple) सकाळी खाल्ल्याने पोटावर साठलेली चरबी कमी होते, कारण त्यात डिटॉक्स घटक असतात.

  • रात्री फळे खाणे योग्य की अयोग्य

रात्रीच्या वेळी फळे (Fruits) खाल्ल्याने झोप येण्यास मदत मिळते असेही अनेकांचे म्हणणे आहे. पण असे अजिबात नाही. झोपण्यापूर्वी फळे खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते. झोपेच्या काही तास आधी फळे खाल्ल्याने अनेक फायदे होतात. एवोकॅडो, अननस, किवी ही अशी फळे आहेत, जी रात्री खाणे फायदेशीर असू शकते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Shreyas Iyer Record: धावांचा पाऊस आणि विक्रमी विजय! श्रेयस अय्यरने मोडला धोनीचा रेकॉर्ड; बनला नंबर-1 टी-20 कर्णधार

VIDEO: मध्यरात्री 'नाईटी'वाल्या चोरांचा धुमाकूळ! वेल्डिंगने चक्क ATM मशीन फोडली, लाखोंची कॅश घेऊन रातोरात पसार; व्हिडिओ व्हायरल

Virat Kohli Test Retirement: अजित आगरकरांमुळे विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून घेतली निवृत्ती? वसीम जाफर यांच्या विधानाने क्रिकेटविश्वात चर्चेला उधाण

Viral Video: डिलिव्हरी ऑर्डर कोणाची, यावरून वाद अन् थेट हाणामारी! तरुणाला पळवून-पळवून चोपलं, व्हिडिओ व्हायरल

Riyadh Airport Missile Attack: मिसाइल कोसळताच उठला आगीचा मोठा लोळ, रियाद विमानतळावरील 'त्या' थरारक क्षणांचा हादरवणारा व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT