Health Tips in Marathi Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Health Tips: भरपूर वर्ष जगायचं आहे? फक्त काही सवयी बदला आणि 'या' गोष्टी पाळा

Health Tips in Marathi: सकाळच्या नाश्त्याला आपण इंग्रजीमध्ये ब्रेकफास्ट असं म्हणतो कारण रात्रीपासून केलेला उपास एकार्थाने तुटत असतो

Akshata Chhatre

Lifestyle Tips For Healthy Life In Marathi

आपल्या दैनंदिन आयुष्यात आपण अनेकवेळा काळात-नकळत अशा काही चुका करत असतो ज्यामुळे शरीराला मोठ्या प्रमाणात हानी होण्याची शक्यता निर्माण होते. कामाच्या नादात किंवा तणावाच्या स्थितीत आपल्याकडून बऱ्याचवेळा शरीराकडे दुर्लक्ष केलं जातं. तुमच्याकडून सुद्धा अशाच चुका होतायत का? तुमच्या मनात हो असं उत्तर येत असेल तर सांभाळून रहा कारण तुम्ही चुकताय, कदाचित तुम्हाला या गोष्टीचं महत्व पटणार नाही, मात्र येणाऱ्या काळात त्याचा गंभीर परिणाम नक्कीच होऊ शकतो. चला मग जाणून घेऊया अशा कोणत्या गोष्टी आहेत जेणेकरून आपण उत्तम आयुष्य जगू शकतो....

नाश्त्याची वेळ चुकवू नका:

सकाळच्या नाश्त्याला आपण इंग्रजीमध्ये ब्रेकफास्ट असं म्हणतो कारण रात्रीपासून केलेला उपास एकार्थाने तुटत असतो.

सकाळी सकाळी खाल्लेलं अन्न अंगाला नीट लागलं पाहिजे म्हणून या नाश्त्यामध्ये पौष्टिक खाद्यपदार्थांचा समावेश करा. दूध प्या, फळं खा,काही अंडी खा यामुळे तुम्हाला दिवसभर एनर्जी मिळेल.

८ तासांची झोप घ्या:

झोप नीट न झाल्यास अनेक समस्य निर्माण होऊ शकतात, आणि म्हणूनच प्रत्येकाला किमान ८ तासांची झोप महत्वाची असते. ज्या लोकांची झोप नीट होत नाही त्यांना हृदयाच्या किंवा स्ट्रोकसारख्या समस्य पडकू शकतात.

झोपताना फोन दूर ठेवा:

मोबाईल हा आपल्यासाठी जेवढा महत्वाचा असतो तेवढाच तो हानिकारक आहे हे कायम लक्षात असुद्या. मोबाईल जर का एकदम जवळ ठेऊन झोपत असाल तर त्याचे रेडिएशन्स खूप हानिकारक ठरू शकतात हे लक्षात ठेवा.

पाणी भरपूर प्या:

पाणी पिणं ही गोष्ट क्षुल्लक वाटत असली तरीही पाण्याशिवाय निरोगी आयुष्याचा उत्तम पर्याय असू शकत नाही. शरीरातील हानिकारक घटक बाहेर काढून टाकण्यात पाणी मदत करत असतं, त्यामुळे दरदिवशी किमान ४ ते ५ लिटर पाणी प्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bangladesh Violence: बांगलादेश पुन्हा पेटले! शेख हसीना विरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार; भारतीय नागरिकांसाठी ॲडव्हायझरी जारी

कंडोमवरचा टॅक्स कमी करा; पाकिस्तानने IMF समोर पुन्हा पसरले हात, पदरी पडली निराशा

Bharat Taxi: रिअल-टाइम ट्रॅकिंग आणि सुरक्षित प्रवास; केंद्र सरकार लाँच करणार 'भारत टॅक्सी' अ‍ॅप, ओला-उबरला टक्कर

Bangladesh Violence: बांगलादेशात माणुसकीला काळिमा! हिंदू तरुणाची निर्घृण हत्या, मृतदेह झाडाला टांगून जाळला Watch Video

Margao: मडगावात पादचारी पूल बंद! टॅक्सीचालक, दुकानदारांमध्ये नाराजी; साबांखा मंत्र्यांनी केली पाहणी

SCROLL FOR NEXT