Akshata Chhatre
गोवेकरांची संध्याकाळ चहाशिवाय अपूर्ण असते. कापभरून चहा आणि सोबत एखादी फाती बिस्कीट ही हवीच असते.
पण कधी विचार केलाय का गोव्यात जर चहा एवढा प्रिय असेल तर त्यासोबत ते काय खात असतील?
गोव्यात चहाचे बरेच मित्र आहेत, यांमध्ये काप-पाव किंवा बन्स हा त्याचा सगळ्यात जवळचा मित्र.
वाफाळत्या चहाची मजा वाढवायची असेल तर सोबत तळलेल्या मिरच्या किंवा कांदा भजी नक्कीच खाता येतात.
गोव्यातली लोकं चहाची बऱ्यापैकी चाहती आहेत त्यामुळे इथे अनेकवेळा उपीट सुद्धा चहाची मजा वाढवून जातं.
पोहे देखील गोवेकरांच्या आवडीचा पदार्थ आहे, त्यामुळे चहा पोहे हे कॉम्बिनेशन सुद्धा आनंदाने खाल्लं जातं.
संध्याकाळच्या वेळी चहा झाला नाही एकवेळ रात्र होणार नाही, कारण गोवा आणि चहा यांचं कनेक्शन एवढं स्ट्रॉंग आहे.