Kitchen Hacks | Don't put These Things in Refrigerator Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Kitchen Hacks : तुम्हीही 'हे' खाद्यपदार्थ फ्रीजमध्ये ठेवत असाल, तर आजच बंद करा ही सवय!

आजच्या युगात फ्रीज हा आपल्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे.

Kavya Powar

Refrigerator Tips: आजच्या युगात फ्रीज हा आपल्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे. अनेकदा आपण खाद्यपदार्थ फ्रीजमध्ये ठेवून साठवतो. फळे, भाज्या, चॉकलेट, अंडी इत्यादी बाजारातून आणल्यानंतर लगेच फ्रीजमध्ये ठेवले जातात.

पण तुम्हाला माहित आहे का की या गोष्टी फ्रीझमध्ये ठेवल्याने अनेक तोटे होतात, त्यांचे पोषणमूल्य कमी होते. त्यांची चव तर बदलतेच पण त्याचा आरोग्यावरही वाईट परिणाम होतो. चला तर मग त्यांच्याबद्दल जाणून घेऊया....

हे खाद्यपदार्थ फ्रीजमध्ये ठेवणे टाळा

ब्रेड

जेव्हा लोक बाजारातून ब्रेडचे पॅकेट विकत घेतात तेव्हा ते थेट फ्रीजमध्ये ठेवतात. पण असे केल्याने ब्रेड कोरडे होते आणि त्याची चवही बदलते. यामुळे पचनाच्या समस्या उद्भवू शकतात.

केळी

अनेक वेळा लोक केळी ताजी ठेवण्यासाठी फ्रीझमध्ये ठेवतात. पण असे करणे हानिकारक ठरू शकते. केळी फ्रीजमध्ये ठेवल्यास ती लवकर काळी पडतात. याशिवाय फ्रीजमध्ये ठेवलेल्या केळ्यांमधून इथिलीन गॅस बाहेर पडतो, त्यामुळे आजूबाजूची फळेही खराब होऊ लागतात.

टरबूज

टरबूज आणि खरबूज फ्रीजमध्ये ठेवल्यानेही नुकसान होऊ शकते. वास्तविक ही फळे फ्रीझमध्ये ठेवल्याने त्यात आढळणारे अँटीऑक्सिडंट नष्ट होतात आणि त्यांची चवही बदलते.

मध

मध कधीही रेफ्रिजरेटरमध्ये ठेवू नये, असे केल्याने मधामध्ये क्रिस्टल्स तयार होतात आणि ते खाल्ल्याने आरोग्यास हानी पोहोचते.

बटाटे

बटाटे फ्रीजमध्ये ठेवल्याने त्यातील स्टार्च खराब होते. तसेच त्यांची चवही बदलते.

संत्री

संत्री आणि लिंबू यांसारखी फळे अ‍ॅसिडिक असल्याने ती फ्रिजमध्ये ठेवू नयेत. कारण थंड तापमानामुळे ते खराब होऊ शकतात.

टोमॅटो

फ्रीजमध्ये ठेवल्याने टोमॅटोची बाहेरची त्वचा खराब होते, तर टोमॅटो आतून लवकर मऊ होऊ लागतो आणि खराब होतो. बरेच लोक या प्रकारचे टोमॅटो देखील खातात जे आरोग्यास हानी पोहोचवू शकतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

EPFO कडून पेन्शनधारकांसाठी मोठी खूशखबर! आता घरी बसून जमा करता येणार 'डिजिटल लाईफ सर्टिफिकेट'; जाणून घ्या पद्धत

Abhishek Sharma T20 Record: सिक्सर किंग अभिषेक शर्माची कमाल! पॉवरप्लेमध्ये 100 षटकार मारणारा ठरला जगातील पहिला फलंदाज; रोहित शर्माला सोडले मागे

Donald Trump Iran Jail: डोनाल्ड ट्रम्पला इराणनं तुरुंगात डांबलं? तेहरानमधील व्हायरल व्हिडिओनं जगात खळबळ; अमेरिकेच्या दादागिरीला चोख प्रत्युत्तर VIDEO

Codli Iron Ore Mine: कोडली खाण पुन्हा सुरू करण्यावर संमिश्र प्रतिक्रिया; रोजगाराची आशा, पण पाणी, शेती आणि प्रदूषणाची गंभीर चिंता

Made In India Smartphone Brand: ॲपल-सॅमसंगला देणार टक्कर! भारत 2028 पर्यंत लॉन्च करणार स्वतःचा स्मार्टफोन ब्रँड; केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली मोठी अपडेट

SCROLL FOR NEXT