Health Tips | Mouth Care Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Health Tips: तोंडाची दुर्गंधी घालवण्याचे रामबाण उपाय

Health Tips: तोंडाची दुर्गंधी घालवण्यासाठी हे आहेत आयुर्वेदिक उपाय

दैनिक गोमन्तक

Health Tips: तोंडाचा सारखा वास येणं उत्तम आरोग्याचं लक्षण नाही. तोंडाचा वास आल्याने अनेकदा आपल्यामुळे समोरच्या व्यक्तीला किळसवाणे वाटू शकते. आपण कितीही चांगले कपडे घातले तरी तोंडाला येणाऱ्या खराब वासामुळे लोकांसमोर आपली फजिती होते. ते टाळायचे असेल तर काही आयुर्वेदिक उपाय सांगितले जातात.

दरम्यान, त्याबाबत आपण आज जाणून घेऊयात. त्याआधी आपण तोंडाच्या दुर्गंधी मागील कारणे जाणून घेणार आहोत. दातांची काही समस्या असल्यास तोंडाचा वास अधिक येतो. दातांची अस्वछता हे त्यामागचे सर्वात मोठे कारण आहे. कॅव्हिटीजमुळे पण तोंडाचा वास येतो. चुकीच्या प्रकारे जेवणात काही खाल्लं तरी तोंडाचा वास येतो.

तसेच, लसून तसेच कच्चा कांदा (Onion) जेवताना खाल्ला की तोंडाचा खराब वास जास्त येतो. पोट खराब असल्यावर, अपचन होत असल्यावर तोंडाची दुर्गंधी वाढते. बरेच लोक क्रॅश डाएट किंवा हायड्रेशनची काळजी घेत नाहीत, त्यामुळे तोंडातून दुर्गंधी येऊ लागते. खाण्याव्यतिरिक्त इतर अनेक आजारांमुळे तोंडातून दुर्गंधी येऊ लागते.

उदाहरणार्थ, मधुमेह आणि किडनीच्या समस्यांमुळे तोंडातून दुर्गंधी येणे सुरू होते. तोंडाच्या दुर्गंधीला दूर करण्यासाठी काही महत्वाचे आयुर्वेदिक उपाय सांगितले जातात. सकाळी उठल्यानंतर निंबाच्या तसेच लवंगयुक्त टुथपेस्टचा वापर करावा. यामुळे दातही सुरक्षित राहतील आणि कोणत्याही प्रकारचा वास येणार नाही.

याशिवाय तुम्ही त्रिफळा पावडर देखील वापरू शकता. किचनमध्ये असलेली बडीशेप ही अशीच एक गोष्ट आहे, ज्याचा वापर करून तोंडातील दुर्गंधी सहज दूर केली जाऊ शकते. बडीशेपबाबत डॉक्टर (Doctor) देखील याचे सेवन करण्याचा सल्ला देतात.

यामुळे तोंडाचा वास तर दूर होतोच पण तो ताजातवाना राहतो. वेलचीच्या वापरानेही तोंड ताजे ठेवता येते. तसेच तोंडाच्या दुर्गंधीची समस्या या उपायांमुळे दूर करणे शक्य होईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दारुची नशा अन् एआयचा किळसवाणा खेळ! चालत्या ट्रेनमध्ये ChatGPT वर बुरखाधारी महिलेचा बनवला आक्षेपार्ह फोटो; भामटा पोलिसांच्या कचाट्यात VIDEO

Usha Nadkarni: पतीशी कोणतंही नातं नाही, मुलगा आई मानत नाही... 80 व्या वर्षीही एकट्याच आयुष्य जगतात उषा नाडकर्णी, वैयक्तिक आयुष्याबाबत मोठा खुलासा

Sexual Assault Case: लैंगिक अत्याचार प्रकरणात तरुण तेजपालला 10 वर्षांची शिक्षा! हायकोर्टाकडून 2 आठवड्यात सरेंडरचा आदेश

Gujrat Well Water Waves: निसर्गाचा अद्भूत चमत्कार! विहिरीत अचानक उठल्या समुद्रासारख्या लाटा! गुजरातमधील रहस्यमय घटनेनं सगळेच हैराण Watch Video

Viral Stunt Video: वयाच्या 97 व्या वर्षीही जबरदस्त जिद्द! आजीने उडत्या विमानातून केला थरारक स्टंट, नेटकरी हैराण; एकदा पाहाच हा व्हायरल व्हिडिओ

SCROLL FOR NEXT