High Bp Dainik Gomantak
लाइफस्टाइल

High Blood Pressure: उच्च रक्तदाबाला कारणीभूत ठरु शकतात 'या'4 गोष्टी

High Blood Pressure:वाढत्या ताण-तणावामुळे उच्च रक्तदाबाचा त्रास उद्भवतो.

दैनिक गोमन्तक

High Blood Pressure: मधुमेही लोकांच्या आरोग्याशी संबंधीत एक महत्वाची समस्या म्हणजे हाय ब्लडप्रेशर. डायबिटीज असलेल्या रुग्णांना काही काळानंतर हाय ब्लडप्रेशरचा त्रास सुरु होतो. त्याविषयी दुर्लक्ष केले तर आरोग्यावर गंभीर परिणाम होतात.

यामुळे हृदयविकाराचा झटका, मूत्रपिंड निकामी होणे, स्मृतिभ्रंश होण्याचा धोका असतो. लठ्ठपणा, धूम्रपान, दारु पिणे, बैठी जीवनशैली, अनुवांशिकता या कारणांमुळे उच्च रक्तदाबाचा त्रास उद्भवतो.

High Bp

जर तुमचा रक्तदाब 140/90 mmHg किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर समजावे, तुम्हाला उच्च रक्तदाब असू शकतो. पण उच्च रक्तदाबाची अशी काही ठळक लक्षणे नाहीत. त्यामुळे या आजाराचे निदान होण्यास बराच वेळ जातो. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या मते, भारतातील प्रत्येक 4 लोकांपैकी एका व्यक्तीला उच्च रक्तदाबाचा त्रास होतो. उच्च रक्तदाब (High Blood Pressure) ज्यामुळे वाढतो ते गोष्टी कोणत्या? याबाबत आपण जाणून घेऊयात.

स्लीप एपनिया दरम्यान रक्तातील ऑक्सिजनच्या पातळीत अचानक घट झाल्याने रक्तदाब वाढतो आणि हृदय, रक्तवाहिन्यांशी संबंधीत प्रणालीवर ताण येतो. अशा परिस्थितीत तज्ञ, रोज 7 ते 8 तास शांत झोप घेण्याचा सल्ला देतात.

तसेच पॅकबंद आणि प्रक्रिया केलेले अन्न पदार्थ शरीराला अपायकारक असतात. तसेच फास्ट फूड, चिप्स, कुकीज आणि सॉस या पदार्थांमध्ये जास्त प्रमाणात सोडीयम असते. ज्याचा रक्तदाबावर थेट परीणाम होतो. प्रक्रिया केलेल्या अन्नामुळे वजन वाढते, ज्यामुळे हृदयाला रक्त पंप करणे कठीण होते.

दरम्यान, सामान्य डोकेदुखी, सांधेदुखीचा त्रास होत असल्यावर अनेकांना सतत पेनकिलर घेण्याची सवय असते. या गोळ्यांमुळे लगेच आराम मिळतो. पण यामुळे बीपीचा त्रास होतो. व्यस्त जीवनशैलीमध्ये काम आणि पर्सनल लाईफ यांचा बॅलन्स ठेवणं अवघड जातं. ताण-तणाव वाढतो. एकाकीपणा येऊन नैराश्य (Stress) वाढते. वाढत्या ताण-तणावामुळे उच्च रक्तदाब वाढतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT