Green Vegetables Side Effect Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Green Vegetables Side Effect: 'हे' आजार आहेत? मग हिरव्या भाज्यांचे सेवन टाळाच

हिरव्या भाज्या खाणे आरोग्यासाठी फायदेशीर असते पण काही लोकांनी या भाज्या खाणे टाळले पाहिजे. याचे कारण जाणून घेउया.

दैनिक गोमन्तक

Green Vegetables Side Effect: हिरव्या भाज्या खाणे आरोग्यासाठी फायदेशीर असते. कारण यामध्ये अनेक पोषक घटक असतात. आपल्या देशात फक्त हिवाळ्यातच जास्त हिरव्या भाज्या मिळतात. पण उन्हाळ्यासुद्धा अनेक हिरव्या भाज्या मिळतात.त्यांचे सेवन करावे.

पण हिरव्या भाज्या देखील प्रत्येकासाठी फायदेशीर नसतात. काही लोकांसाठी हिरव्या भाज्या फायदेशीर नसून शरीराला हानी पोहोचवतात.

  • मूत्रपिंड

किडनी हा आपल्या शरीराचा एक अतिशय महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळे त्यांच्याशी संबंधित आजार खूप गंभीर आहेत. विशेषत: ज्या लोकांना किडनीशी संबंधित आजार जसे किडनी स्टोन त्यांना हिरव्या पालेभाज्या न खाण्याचा किंवा त्या कमी प्रमाणात खाण्याचा सल्ला दिला जातो.

  • गॅस समस्या

क्रॉन्स डिसीज, इन्फ्लेमेटरी बोवेल सिंड्रोम इत्यादी आजारांनी ग्रस्त असलेल्या रुग्णांना हिरव्या भाज्या खाण्यास मनाइ केली जाते. कारण यामुळे पोटात गॅस, वेदना आणि क्रॅम्प्स होतात. हिरव्या पालेभाज्या आणि ब्रोकोली यांसारख्या हिरव्या भाज्यांमध्ये भरपूर फायबर असल्यामुळे गॅस होतो आणि त्यामुळे गॅसच्या समस्या उद्भवू लागतात.

  • या औषधांसह हिरव्या भाज्या

शरीराशी निगडीत आजारच नाही तर आजारांवर औषधे घेतली जात असल्याने काही वेळा हिरव्या भाज्यांमुळे पोटात समस्या निर्माण होतात. हिरव्या पालेभाज्या सामान्यत: उच्च प्रमाणात व्हिटॅमिन के आढळते.

जे सामान्यतः रक्त पातळ करणाऱ्या औषधांशी संबंध साधू शकतात. वॉरफेरिन रक्त पातळ करते जेणेकरून ते असामान्यपणे गुठळ्या होत नाही, तर व्हिटॅमिन के त्याच्या कार्यात व्यत्यय आणते.

  • शस्त्रक्रियेपूर्वी आणि नंतर

शस्त्रक्रियेपूर्वी आणि नंतर हिरव्या पालेभाज्या टाळण्याचा सल्ला दिला जातो. जर आतड्यांसंबंधी कोणतीही शस्त्रक्रिया झाली असेल, तर डॉक्टर शस्त्रक्रियेपूर्वी 12 तास आणि शस्त्रक्रियेनंतर एक किंवा दोन आठवडे हिरव्या पालेभाज्या न खाण्याचा सल्ला दिला जातो.

पण, कोणत्या भाज्या आणि पदार्थ खावेत आणि कोणते सेवन करू नये, इत्यादी गोष्टी डॉक्टरांकडून समजून घ्यावे

हिरव्या पालेभाज्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. म्हणूनच त्या आहारात असणे देखील आवश्यक आहे. पण कही लोकांसाठी योग्य नाही. म्हणूनच वेळेत याबद्दल डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT