Weight Loss Diet Tip Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Weight Loss Diet Tip: दिवाळीनंतर बॉडी डिटॉक्स अन् वजन कमी करण्यासाठी फॉलो करा 'या' टिप्स

Weight Loss Diet Tip: दिवाळीत तळलेले आणि जड पदार्थ खाल्ल्यानंतर वजन वाढते. हे कमी करण्यासाठी तुम्ही पुढील डायट फॉलो करू शकता.

Puja Bonkile

Weight Loss Diet Tip: दिवाळी किंवा इतर कोणत्याही सणांच्या वेळी आपण सगळेच जड पदार्थ खातो. अनेक वेळा हे अन्न पचणे पोटाला कठीण होते. अन्न नीट पचले नाही तरी शरीरात विषद्रव्ये वाढतात.

वजन कमी करण्यासाठी हेल्दी डाएट फॉलो करणारे लोक सणासुदीच्या काळात योग्य आहार घेऊ शकत नाहीत, त्यामुळे वजन वाढते. अशावेळी तज्ज्ञांनी सुचविलेला डाएट प्लॅन दिवाळीनंतर वजन कमी करण्यासाठी आणि शरीरातील डिटॉक्सिफिकेशनमध्ये मदत करू शकते. 

  • सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी कोमट पाणी हळद टाकून प्यावे. तसेच त्यात लिंबाचा रस घालावा. हे शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्यास मदत करते आणि पचन सुधारते.

  • नाश्त्यात हरभरा चाट खावे. यामध्ये प्रथिने आणि फायबर मुबलक प्रमाणात असते. यामुळे शरीराला शक्ती मिळते, पोट भरलेले राहते

  • शरीर डिटॉक्स करण्यासाठी योग्य चयापचय असणे महत्वाचे आहे. यासाठी मधल्या जेवणात पपई खा आणि 1 ग्लास चिया सीड्स पाणी प्यावे. चिया सीड्स ओमेगा-३ फॅटी ऍसिडचा चांगला स्रोत आहेत.

  • दुपारच्या जेवणात मूग डाळ खिचडी खाल्ल्यास पोटाला आराम मिळतो. पोटाला ते पचायला सोपे जाते. त्यासोबत दही आणि कोशिंबीर खावे. त्यामुळे शरीराला पूर्ण पोषण मिळेल.

  • संध्याकाळचा नाश्ता म्हणून हर्बल चहासोबत मूठभर मखना खावा. मखाणामध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते आणि कॅलरीज खूप कमी असतात. हे पचनासाठी चांगले आहे, बद्धकोष्ठता दूर करते आणि वजन कमी करण्यास मदत करते.

  • नाचणीच्या पिठाचे सूप भाज्यांमध्ये मिसळून बनवा आणि रात्रीच्या जेवणात प्या. यामध्ये फायबर आणि पोषक तत्वे मुबलक प्रमाणात आढळतात. हे पचनास मदत करते आणि शरीर डिटॉक्सिफाय करते.

  • झोपण्यापूर्वी कढीपत्त्याचे पाणी प्यावे. हे वजन कमी करण्यासाठी, पोटाची चरबी वितळण्यासाठी आणि शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्यासाठी उपयुक्त आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT