health care tips Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Health Care Tips: दूधासोबत 'या' 7 पदार्थांचे कॉम्बिनेशन ठरू शकतं हानिकारक

दूध हे पौष्टिकतेचे निरोगी आरोग्यासाठी उत्तम स्रोत मानले जाते, परंतु काही पदार्थांसोबत त्याचे सेवन करणे घातक ठरू शकतं.

Puja Bonkile

Health Care Tips: शरीर निरोगी ठेवण्यासाठी पोषक तत्वांची मुबलक प्रमाणात आवश्यकता असते. रोज एक ग्लास दूध प्यायल्यास अनेक फायदे होतात. दूधात कॅल्शियम, प्रथिने, व्हिटॅमिन ए, बी6, डी, मॅग्नेशियम, फॉस्फरस आणि आयोडीन यांसारखे पोषक घटक असतात. दूध हे पौष्टिकतेचे उत्तम स्रोत मानले जाते. पण काही पदार्थांसोबत त्याचे सेवन करणे घातक ठरू शकते. हे पदार्थ कोणते आहेत जाणून घेऊया.

  • मासे 

मासे खाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. मासे कधीच दुधासह खाऊ नये. यामुळे, तुम्हाला पचनाशी संबंधित समस्या जसे की पोटदुखी आणि अन्न विषबाधा यासारख्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते.

  • मसालेदार पदार्थ

जर तुम्ही अनेकदा दुधासोबत मसालेदार पदार्थ खात असाल तर आतापासून असे करू नका. कारण यामुळे अ‍ॅसिड रिफ्लक्सचा धोका तसेच अपचनाचा त्रास होऊ शकतो.

  • नमकिन स्नॅक्स

चिप्स,चिवडा,चखली सारख्या नमकीन स्नॅक्ससोबत दूध पिण्याची चूक करू नका. कारण त्यात भरपूर मीठ मिसळले जाते, ज्यामुळे शरीरातील इलेक्ट्रोलाइट संतुलन बिघडू शकते. 

  • प्रथिने समृद्ध पदार्थ

दुधात प्रथिने आधीच मुबलक प्रमाणात असते. जर तुम्ही प्रथिनेयुक्त पदार्थ खाण्यास सुरुवात केली तर अचानक तुमच्या पचनसंस्थेवरचा भार वाढू शकतो. पचनाशी संबंधित समस्या वाढू शकतात.

  • दही

आयुर्वेदानुसार दुधासोबत दही कधीही खाउ नये. तसेच दूध प्यायल्यानंतर दहीही खाऊ नये. कारण ते आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतं. यामुळे तुम्हाला पोटाची समस्या आणि पोट खराब होऊ शकते.

  • आंबट फळे

दुधासोबत आंबट फळे खाणे टाळावे. दूध आणि आंबट फळं फळे एकत्र सेवन केल्यास पोटदुखी आणि उलट्या होऊ शकतात. आंबट फळं खाल्ल्यानंतर दोन तासांनीच दूध प्यावे.

  • गूळ 

अनेक लोक गोडपणासाठी दुधात गूळ मिक्स करून घेतात. गूळ आरोग्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर आहे. पण आयुर्वेदात दूध आणि गुळाचे एकत्र सेवन करणे हानिकारक मानले गेले आहे. यामुळे तुमचे पोट खराब होऊ शकते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT