Raisins Health Benefits Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Raisins Health Benefits : शरीरासाठी अत्यंत फायदेशीर आहेत मनुके; पण किती खायचे ते घ्या जाणून

Raisins Health Benefits : रोज बेदाणे खाण्याचे अनेक फायदे आहेत.

दैनिक गोमन्तक

Raisins Health Benefits : तुमच्या आहारात बेदाणे अवश्य समाविष्ट करा. रोज बेदाणे खाण्याचे अनेक फायदे आहेत. मनुका अतिशय स्वस्त, आरोग्यदायी आणि चवदार असतात. सर्वात स्वस्त सुक्या मेव्यामध्ये याचा समावेश होतो. द्राक्षे सुकवून मनुका तयार करतात.

यामध्ये अनेक पोषक तत्वे आढळतात. बेदाण्यामध्ये प्रथिने, लोह आणि फायबर भरपूर प्रमाणात असतात. शरीरातील व्हिटॅमिन बी6, कॅल्शियम, पोटॅशियम आणि कॉपरची कमतरता दररोज मनुका खाल्ल्याने पूर्ण होऊ शकते. मनुका खाल्ल्याने शरीराला भरपूर अँटीऑक्सिडेंट आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्म मिळतात. व्हिटॅमिन ई आणि हेल्दी फॅट देखील मनुकामध्ये आढळतात. मनुका जरूर खा. (Health Care News Raisins Health Benefits)

मनुका खाण्याची योग्य पद्धत

तसे तर तुम्ही मनुके असेच खाऊ शकता, पण त्याचा पुरेपूर फायदा मिळवण्यासाठी मनुके भिजवून खावे. मनुका रात्रभर भिजत ठेवा आणि सकाळी रिकाम्या पोटी मनुका आणि त्याचे पाणी प्या. यामुळे शरीरातील लोहाची कमतरता दूर होते. अशाप्रकारे मनुका खाल्ल्याने हिमोग्लोबिन झपाट्याने वाढते. याने सर्व पोषक तत्व शरीराला उपलब्ध होतात.

दिवसात किती मनुके खावेत?

मनुके खायला खूप चविष्ट असतात, पण जास्त खाल्ल्याने लठ्ठपणा वाढून रक्तातील साखर वाढण्याचा धोका असतो. तुम्ही रोज फक्त 5 ते 10 मनुके खावेत.

फायदे

  • मनुका खाल्ल्याने मुलांचा शारीरिक आणि मानसिक विकास चांगला होतो.

  • भिजवलेले मनुके खाल्ल्याने वजन कमी होण्यास मदत होते. यातून लोह, मॅग्नेशियम, कॅल्शियम आणि फायबर सारखे पोषक घटक मिळतात.

  • यामधून कॅल्शियम मिळते, त्यामुळे हाडे आणि दात निरोगी राहतात.

  • पुरुषांनी मनुका खावे. मनुका मधासोबत खाल्ल्याने शुक्राणूंची संख्या वाढते.

  • दात आणि हिरड्यांमधील पोकळी दूर करण्यासाठीही मनुका खाण्याचा सल्ला दिला जातो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT