Happy Relationship  Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Happy Relationship: नवविवाहित जोडप्यांनो ... नात्याची सुरुवात चांगली होईलच; पण हळूहळू ते बहरेलही

पती-पत्नीमधील नातं घट्ट करायचे असेल तर तुम्ही सकाळी या ५ गोष्टी केल्या पाहिजेत.

Puja Bonkile

Happy Relationship: कोणतेही नातं टिकवण्यासाठी त्यात प्रेम आणि विश्वास असणे गरजेचे असते. तसेच दोघांमध्ये एकमेकांसाठी आदर, काळजी देखील असणे गरजेचे असते. पण तुम्हाला माहिती आहे का रोजच्या काही सवयींमुळे देखील तुमच्या नात्यात गोडवा वाढू शकतो. तुम्हालाही तुमच्या नात्यातील गोडवा वाढवायचा असेल तर तुम्ही पुढिल गोष्टी फॉलो करू शकता.

गुड मॉर्निंग आणि गुडबाय बोलावे

तुमच्या जोडीदाराला “गुड मॉर्निंग” आणि “गुड बाय” बोलल्यास एकमेकांबद्दल आपुलकी वाढते. जेव्हा तुम्ही तुमच्या जोडीदाराला रोज सकाळी प्रेमाने उठवता तेव्हा त्यांचा संपूर्ण दिवस फ्रेश जातो. तसेच जेव्हा तुम्ही कामासाठी घरातून निघताना गुडबाय बालता तेव्हा जोडीदाराला चांगले वाटते. यामुळे जोडीदाराच्या मनात कधीच दुसऱ्या व्यक्तीबद्दल विचार येत नाही.

सकाळी चहा सबोत घ्यावा

रोज सकाळी जोडीदारासबोत चहा किंवा नाश्ता करावा. यामुळे नातं अधिक फुलतं. चहा किंवा नाश्ता करताना एकमेकांसबोत गोष्टी शेअर कराव्या.

थँक्यु बोलावे

लाइफ पार्टनर म्हणजे आयुष्याच्या प्रत्येक वळणावर एकमेकांना मदत करण्यासाठी सदैव तत्पर असणे. तुम्ही तुमच्या जोडीदाराला थँक्यु बोलले पाहिजे. जेव्हा तुम्ही अगदी छोट्या गोष्टींसाठी थँक्यु बोलता तेव्हा तुम्ही तुमच्या जोडीदाराला ते किती महत्त्वाचे आहेत हे दाखवत आहात. यामुळे तुमच्या नात्यात प्रेम आणि विश्वास अधिक वाढतो.

मनमोकळेपणाने बोलावे

झोपेतून उठल्यानंतर तुम्हाला कोणाशीही बोलणे आवडत नसले तरी तुमच्या जोडीदारासोबत सकाळी मनमोकळेपणाने बालु शकता. यामुळे तुमचे नाते घट्ट होण्यास मदत होऊ शकते. एकमेकांना दुखावणाऱ्या गोष्टी बोलू नका.

दिवसाची सुरुवात प्रेमाने करा

दररोज सकाळी आपल्या जोडीदाराला मिठी मारणे आणि चुंबन घेणे हे नेहमीच नातेसंबंधात प्रेम वाढवण्यास मदत करते. कारण जेव्हा तुम्हाला बरे वाटते तेव्हा तुमच्या शरीरात जास्त आनंदी हार्मोन्स तयार होतात. रोमँटिक होण्यासाठी शारिरिक संबंध ठेवणे गरजेचे नाही तर तुम्ही छोट्या गोष्टींमधुन देखील प्रेम व्यक्त करू शकता. जसे की नाश्ता करताना हात पकडणे किंवा काम करताना चुंबण घेणे यासारख्या छोट्या गोष्टींमुळे तुमचे नातं घट्ट होऊ शकते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'माझ्या दारात संकट नाही, तर मला काय देणे-घेणे?' शतकापूर्वी सावरकरांनी कोरडे ओढलेली संकुचित मानसिकता आजही उभी

Budh Nakshatra Parivartan 2026: 8 ऑगस्टपासून 'या' राशींचे नशीब उजळणार; बुधाच्या नक्षत्र बदलाने यशाचे नवे मार्ग खुलणार

Under Secretary Recruitment: अवर सचिव भरतीला कोर्टाचा 'ब्रेक'; राज्य सरकारला दणका; 2 महिला अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीचा फेरविचार करण्‍याचा आदेश

36 Villages Without 4G 5G In Goa: हायस्पीड इंटरनेटपासून 36 गावे अद्याप दूर; खासदार तानावडेंच्‍या प्रश्‍‍नाला केंद्रीय संपर्क राज्‍यमंत्र्यांचे उत्तर

PM Surya Ghar Yojana: 'पीएम सूर्यघर' योजनेअंतर्गत 3,323 घरांवर 'सोलर पॅनेल'; केंद्र सरकारकडून मिळाली 22.58 कोटींची सबसिडी

SCROLL FOR NEXT