Control Hair Fall: Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Control Hair Fall: कमी वयातच केस गळून पडू शकते टक्कल; करा हे घरगुती उपाय

Control Hair Fall: कमी वयात केस गळण्याची समस्या ही हार्मोनल बदल आणि वाईट जीवनशैलीमुळे होऊ शकते. हे टाळण्यासाठी पुढील घरगुती उपाय करू शकता.

Puja Bonkile

hair fall tips try hair loss in young age try these home remedies for healthy hair

आजकाल अनेक लोकांचे कमी वयात केस गळतात. वयाच्या 20 व्या वर्षी मुला-मुलींचे केस गळायला लागतात. कमी वयात केस गळण्याची समस्या हार्मोनल बदल आणि वाईट जीवनशैलीमुळे होऊ शकते.

केसगळतीची समस्या असल्यास केसांची खास काळजी घेणे आवश्यक आहे. केस गळण्यावर कसे नियंत्रण ठेवावे हे जाणून घेऊया.

केस गळतीची समस्या अशी करा दूर

वयाच्या 18-20 व्या वर्षी मुले स्टायलिश राहण्यासाठी केसांना तेल लावत नाही. पण त्यामुळे केस गळू शकतात. केस गळत असतील तर रोज केसांना तेल लावावे.

मुलींना त्यांचे केस खुले ठेवायला आवडतात. यामुळे केस खराब होतात. केसांमध्ये घाण जमा होते. आपले केस शक्य तितके बांधून ठेवावे.

केस स्वच्छ ठेवणे खूप महत्वाचे आहे. आठवड्यातून किमान दोन-तीन वेळा शॅम्पू आणि कंडिशनर वापरावे. केसांची काळजी घेण्यासाठी कंगवा देखील स्वच्छ करणे आवश्यक आहे.

केसांना स्टायलिश बनवण्यासाठी हेअर केअर प्रोडक्ट आणि हिटिंग टूल अति वापरणे टाळावे. यामुळे केस कमकुवत होतात.

या टिप्स फॉलो केल्यास गळणार नाहीत केस

केस गळण्याची समस्या अनेक कारणांमुळे उद्भवू शकते. केस गळण्याची समस्या कमी करणे गरजेचे आहे. केसांमध्ये पोषक तत्वांच्या कमतरतेमुळे केस गळतात. यासाठी केसांना पोषण देणे महत्त्वाचे असते.

केसांचे पोषण मिळण्यासाठी डाळी, अंडी, दूध, पालक यासारख्या पदार्थांचा आहारात समावेश करावा. तणावामुळे देखील केस गळू शकतात. हे टाळण्यासाठी श्वासोच्छवासाचे व्यायाम करून तणाव दूर करा. केस गळणे टाळण्यासाठी, आपल्या केसांच्या मुळात तेलाने मसाज करावी आणि पुरेशी झोप घ्यावी. झोपेच्या कमतरतेमुळे तणाव निर्माण होऊ शकतो. त्यामुळे केस गळतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Land Conversion: 'जमीन रुपांतरणाचे कलम 39A रद्द होणे अशक्य'! मंत्री राणेंचे स्पष्टीकरण; मुख्यमत्र्यांसोबतच्या ‘ट्युनिंग'वर केले भाष्य

Panaji Election: पणजी महापालिकेचा बिगूल! 11 मार्चला मतदान, 13 रोजी मतमोजणी; कसा असेल निवडणूक कार्यक्रम? वाचा..

बर्च क्लबमधील भीषण अग्नितांडवाची गंभीर दखल! किनारी ग्रामपंचायतींना व्यवसाय, बांधकाम परवान्यांचा अहवाल सादर करण्याचे निर्देश

Rashi Bhavishya: कर्ज फिटणार, गोड बातमी मिळणार! मेष ते मीन राशीच्या लोकांसाठी 'कसा' राहील आजचा दिवस? वाचा..

Dhargal: सफर गोव्याची! 1550 साली आक्रमकांपासून वाचवण्यासाठी प्राचीन मंदिर इथे हलवले, हिरव्या शालीत गुंडाळलेलं 'धारगळ'

SCROLL FOR NEXT