Hair Fall Tips in Summer Dainik Gomantak
लाइफस्टाइल

केस गळतीचं प्रमाण होईल कमी; आहारात समाविष्ट करा 'या' गोष्टी

Hair Fall Tips in Summer : केस निरोगी ठेवण्यासाठी तुम्हाला तुमच्या आहारात काही गोष्टींचा समावेश करावा लागेल

दैनिक गोमन्तक

Hair Fall Tips in Summer : उन्हाळ्यात, कडक सूर्यप्रकाश, धूळ, वारा यामुळे कोरडे, निर्जीव आणि केसांची समस्या सतावते. उष्णतेचा केवळ शरीरावरच नाही तर त्वचा आणि केसांच्या आरोग्यावरही परिणाम होतो. उन्हाळ्यात केस गळण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे टाळूला येणारा घाम. त्यामुळे केसांमध्ये ओलावा राहून केस तुटणे, गळणे सुरू होते.

त्यामुळे जर तुमचे केसही उष्णतेमुळे गळत असतील आणि तुम्हाला ते कमकुवत होण्यापासून वाचवायचे असेल, तर तुम्ही तुमच्या आरोग्याची जशी काळजी घेतो तशीच तुमच्या केसांची काळजी घ्या. केस निरोगी ठेवण्यासाठी तुम्हाला फार काही करण्याची गरज नाही, पण तुम्हाला तुमच्या आहारात काही गोष्टींचा समावेश करावा लागेल, ज्यामुळे केसगळती तर थांबतेच पण केस मजबूत होण्यासोबतच शरीरही निरोगी राहते. (Hair Fall Tips in Summer)

1. दही

उन्हाळ्यात दह्याचा आहारात समावेश करावा. कारण दह्यामध्ये कॅल्शियम, व्हिटॅमिन-बी12, व्हिटॅमिन-बी2, पोटॅशियम आणि मॅग्नेशियमसोबत प्रोटीन आढळते. जे केस आणि शरीर निरोगी ठेवण्यास मदत करू शकतात.

2. टरबूज

टरबूज हे उन्हाळ्याच्या दिवसात येणारे हंगामी फळ आहे. टरबूज शरीराला हायड्रेट ठेवते आणि वजन कमी करण्यासाठी देखील प्रभावी आहे. याशिवाय तुम्ही टरबूज खाऊन केस मजबूत करू शकता.

3. बेरी

स्ट्रॉबेरी, ब्लूबेरी आणि क्रॅनबेरी हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जातात. त्यात व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स चांगल्या प्रमाणात असतात, ज्यामुळे उन्हाळ्यात केसांचे नुकसान टाळता येते.

4. आंबा

आंब्याला फळांचा राजा म्हटले जाते. भारतात आंब्याचे अनेक प्रकार उपलब्ध आहेत. आरोग्यासोबतच आंब्याच्या चवीमुळे केसगळती रोखण्यासही मदत होते. आंब्यामध्ये असलेले व्हिटॅमिन ए, सी, कॅल्शियम आणि फोलेट केसांना निरोगी ठेवण्यास मदत करतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

PM Kisan Nidhi 23rd Installment: पीएम किसानचा 2,000 रुपयांचा हप्ता उद्या खात्यात! यादीत नाव नसल्यास पैसे अडकू शकतात, आत्ताच अशी करा पडताळणी

Goa Development: गोव्यासाठी दिल्लीतून सुटला तब्बल 2000 कोटींचा निधी! केंद्र आणि राज्य सरकार मिळून गोव्याचा चेहरामोहरा बदलणार; कामतांचा विश्वास

Goa Tourism: 'पर्यटनात विविधता, कुशल मनुष्यबळ निर्मितीवर सरकारचा भर', राज्यात 5 नवीन महाविद्यालयांची मुख्यमंत्र्यांकडून घोषणा

Goa Water Crisis: "गोव्यातील पाणीटंचाईला सावंत सरकारच जबाबदार", युरी आलेमाव यांचा हल्लाबोल

Afghanistan Drone Attack: सीमेवरील गोळीबाराचा अफगाणिस्ताननं घेतला बदला! अफगाण वायूसेनेचा पाकिस्तानात घुसून मोठा हवाई हल्ला; दहशतवादी तळ उद्ध्वस्त

SCROLL FOR NEXT