Hair Care Tips Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Hair Care Tips: तुम्हीही केसांना कलर केले असेल तर 'अशी' घ्या काळजी

तुम्हीही केसांना नुकतेच कलर केले असेल तर काळजी घेणे गरजेचे आहे.

Puja Bonkile

Hair Care Tips: रंगीत केस बऱ्याच काळापासून ट्रेंडमध्ये आहेत. यात काही शंका नाही की ते काही मिनिटांत तुमचा लूक बदलू शकतात. परंतु केसांना रंग दिल्यानंतर तुम्ही योग्य काळजी घेतली नाही तर ते तुमचा लूक खराब होऊ शकतो. त्यामुळे केसांना रंग दिल्यानंतर केसांची काळजी घेण्याचे तज्ज्ञ शॅम्पूपासून कंडिशनरपर्यंत काही महत्त्वाची खबरदारी घेण्याचा सल्ला देतात.

सल्फेट फ्री शॅम्पू

केसांना रंग दिल्यानंतर नेहमी सल्फेट फ्री शॅम्पू वापरावे. जे खास रंगीत केसांसाठी तयार केले जातात.

किती वेळ केस धुवावे

केसांना रंग दिल्यानंतर वारंवार केस धुणे टाळावे. शॅम्पूमध्ये वापरलेली रसायने टाळूवर साचलेली घाण आणि सीबम काढून टाकतात. परंतु त्यामुळे केसांचा रंग फिका पडतो. आठवड्यातून दोनदा केस धुणे योग्य असते.

केस जास्त धुऊ नका

केसांची मुळे आणि टाळू निरोगी ठेवण्यासाठी हिवाळ्यातही केस खूप गरम पाण्याने धुवू नका. त्याऐवजी फक्त सामान्य किंवा कोमट पाणी वापरावे. गरम पाण्याने केस धुतल्याने पहिले केस कमकुवत होतात आणि खूप तुटायला लागतात आणि दुसरे म्हणजे रंगही हलका होऊ लागतो.

योग्य शॅम्पू

रंगीत केसांसाठी वेगळ्या प्रकारचे शॅम्पू आहे. ज्याचा रंगावर काही फरक पडत नाही, म्हणून ते वापरू शकता. त्यामुळे केस अधिक चमकदार दिसतात. केसांना फक्त रंग दिल्यानंतर कंडिशनरची गरज नाही, तर तुम्ही तुमच्या केसांना सामान्यपणे कंडिशनर लावावे. त्यामुळे केस गुंतणे कमी होतो. कंडिशनर नेहमी लांबीवर लावावे आणि ते केसांपासून पूर्णपणे काढून टाकणे देखील खूप महत्वाचे आहे.

तेलाची मसाज

केसांना निरोगी ठेवण्यासाठी तेल लावणे आणि मसाज करणे खूप महत्वाचे आहे. तुम्ही नारळ किंवा एरंडेल तेल वापरू शकता. ज्यामुळे केस गळणे कमी होते आणि त्यांची वाढ होण्यास मदत होते. तेल थोडे कोमट करून लावणे अधुक चांगले असते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT