Green Vegetables Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Storage Ideas: पालेभाज्यांना दिर्घकाळ फ्रेश ठेवण्यासाठी वापरा 'या' सिंपल ट्रिक्स

पालेभाज्या लवकर खराब होतात. पण दिर्घकाळ फ्रेश ठेवायचे असेल तर पुढील टिप्स फॉलो करू शकतो.

Puja Bonkile

Green Vegetables Storage Ideas: हिवाळ्यात पालेभाज्या मोठ्या प्रमाणात मिळतात. यामध्ये पालक, मेथी, मुळ्याचे पान, लाल माठ यासारखे अनेक पालेभाज्या बाजारात मिळतात. तसेच पालेभाज्यांचे सेवन करणे आरोग्यदायी असते. पण पालेभाज्यांचे योग्यरित्या स्टोअर केल्या नाहीत तर लवकर खराब होतात. पण पुढील काही टिप्स वापरून तुम्ही पालेभाज्या स्टोअर करू शकता.

हिरव्या पालेभाज्या फ्रेश कशा ठेवाव्या

  • पालक फ्रेश ठेवण्यासाठी फ्रिजमध्ये ठेवण्याऐवजी त्याची पाने तोडून वृत्तपत्रात गुंडाळून ठेवीवी. तुम्ही पालकाची पाने वर्तमानपत्रात किंवा कापडी पिशवीत गुंडाळून ठेवू शकता. यामुळे पालक बरेच दिवस फ्रेश राहते.

  • मेथीची पाने फ्रेश ठेवण्यासाठी त्यांना पूर्णपणे स्वच्छ करावे. त्यांना धुवू नका किंवा ओले करू नका. कागदात किंवा कापडात गुंडाळावे. ही ट्रिक वापरली दोन ते तीन दिवस मेशी फ्रेश राहते.

  • कोथिंबीर फ्रेश ठेवण्यासाठी त्यांची मुळे पाण्याने भरलेल्या ग्लासमध्ये किंवा भांड्यात बुडवून ठेवावी. तसेच कोथिंबीर हवाबंद डब्यात ठेवल्यास खराब होत नाही.

  • पालक पनीर किंवा आलू पालकाची भाजी बनवण्यासाठी तुम्हाला पालक वापरायचा असेल तर या पानांची पेस्ट बनवून फ्रीजमध्ये ठेवू शकता. यानंतर ते भाजीसाठी वापरू शकता.

फ्रिजमध्ये पालेभाज्या ठेवताना पुढील गोष्ट लक्षात ठेवा

  • हिरव्या पालेभाज्या नेहमी कापड किंवा वृत्तपत्रात गुंडाळून ठेवाव्या.

  • पालेभाज्या तशाच उघड्या ठेऊ नका.

  • हवाबंद डब्यातही ठेवू शकता.

  • यामुळे ओलावा कमी होतो.

  • पालेभाज्या दीर्घकाळ फ्रेश राहतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Winter Update: राज्यात थंडीचा कडाका वाढला, पुढील काही दिवस कसं असेल हवामान? वाचा

Anjuna Illegal Hotel: मुख्‍य सचिवांसह 7 प्रतिवादींना नोटिसा, हणजूण येथील बेकायदा हॉटेल प्रकरणी याचिकेची दखल

गोवा आध्‍यात्‍मिक पर्यटनाचे केंद्र व्हावे, क्लब रात्री 12 नंतर बंद करावेत; दुर्घटना कमी होतील- मंत्री विश्‍‍वजीत राणे

Goa Zilla Panchayat: जिल्हा पंचायतीत 'नारीशक्ती'ला प्राधान्य, उत्तर गोवा हे अध्‍यक्ष, तर 'दक्षिण'साठी उपाध्‍यक्षपद महिलांसाठी राखीव

दुर्घटना घडल्‍यास जबाबदार कोण? दायित्त्‍व नक्‍की करा, उच्‍च न्‍यायालयाचे राज्य सरकारला निर्देश; घेतली स्‍वेच्‍छा दखल

SCROLL FOR NEXT