Goa Waterfall |dudhsagar waterfall Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Goa Waterfall: धबाबा लोटती धारा ...

गोव्यातून (Goa) बेळगांवला रेल्वेने (Railway) जाताना पहिल्यांदा डाव्या हाताला दूरवरून दूधसागर धबधब्याचे दर्शन घडते.

दैनिक गोमन्तक

'माझ्या गोव्याच्या भूमींत गड्या नारळ मधाचे, कड्याकपारीमधूनी घट फुटती दुधाचे’ ही बा.भ. बोरकर यांच्या कवितेमधली एक ओळ! यातल्या ‘कड्याकपारीमधूनी घट फुटती दुधाचे’ हे शब्द पावसाळ्यात जिथे तिथे साक्षात साकार झालेले दिसतात. लहान-थोर घट इथे-तिथे उपडे होताना, निसर्गाला येणारी वैभवी कळा डोळ्यांत मावता मावत नाही. (goa Dudhsagar waterfall news)

कुठे एखादा तळहाताएवढचा झरा खांचेतून मुक्त होत नाल्या- नद्यांना जाऊन मिळण्यासाठी आतुरतेने धावताना दिसतो तर कुठे ‘गिरीचे मस्तकी गंगा । तेथूनि चालिली बळे । धबाबा लोटती धारा । धबाबा तोय आदळे ।’ असे रामदास स्वामी यांनी केलेल्या वर्णनानुरूप पाणी अवाढव्य स्वरूपात कोसळताना दिसते. पश्‍चिम घाटातील डोंगरदऱ्यात आपल्या सौंदर्याचे रूपगर्वीत दर्शन देत कोसळणारा दूधसागर धबधबा रामदासांच्या शब्दांची हुबेहूब प्रचिती देतो. हा धबधबा वर्षभर कोसळत असतो पण पावसाळ्यात त्याचे चण्ड रूप ‘शिवतांडव स्तोत्र’ गायला प्रवृत्त करते.

गोव्यातून (Goa) बेळगांवला रेल्वेने (Railway) जाताना पहिल्यांदा डाव्या हाताला दूरवरून त्याचे दर्शन घडते. ते डोळ्यांत भरून घेता घेता गाडी वळण घेते आणि तो नाहीसा होतो. काही क्षण अधीरपणे वाट पहायला लावून अचानक तो धबधबा उजव्या हाताला आकाशातून अवतीर्ण होताना दिसतो आणि ‘जटाटवीगलज्जलप्रवाहपावितस्थले...’ याच ओळीच आठवतात. या रेल्वेस्टेशनवर दैवयोगाने गाडी थांबून राहिली तर दुधात साखर पडून नजरेचे पारणे फिटून जाते.

पाऊस (Rain) बऱ्यापैकी बरसतो आहे. त्यामुळे दूधसागरच्या रौद्ररूपाने आकार घ्यायला सुरुवात केली आहे. या दिवसात या शुभप्रपाताचे दर्शन घ्यायची संधी मिळाली तर ती सोडू नका. दूधसागर धबधबा (Dudhsagar waterfalls) पणजीपासून (Panaji) सुमारे 70 किलोमीटर अंतरावर आहे. भारतातील उंच धबधब्यांत या धबधब्याची गणना होते. त्याची उंची 300 मीटरपेक्षा अधिक आहे आणि साधारण रुंदी 30 मीटर आहे. रस्त्याने थेट या धबधब्यापर्यंत जाता येत नाही. धबधब्याच्या पायथ्यापाशी मात्र कुळे गावातून गाडीतून आपल्याला जाता येते. मात्र पावसाळ्यात दूधसागरपर्यंत नेणारी वाहने बंद असतात. अनेक ट्रॅकिंग क्लब मात्र पावसाळ्यातही या ठिकाणी ट्रॅक आयोजित करतात. ‘ट्रॅक ॲण्ड ॲडव्हेंचर’ साठी हे ठिकाण लोकप्रिय आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दोनवेळा घर कोसळले, मदत नाही फक्त आश्वासनं मिळाली; कोलवाळमधील 65 वर्षीय महिलेचा एकाकी संघर्ष

Disneyland In India: भारतात होणार ‘डिस्नेलँड’, 500 एकर परिसरातल्या थीम पार्कला ‘या’ राज्याने दिली मंजुरी

Crocodiles Viral Video: हा कसला वेडेपणा! चक्क मगरीला दुचाकीवर घेऊन प्रवास, व्हिडिओ पाहून म्हणाल, खतरनाक...

Viral Video: भर मैदानात घुसला 'बिनतिकीट' पाहुणा! कुत्र्याच्या एंट्रीनं खेळाडूंमध्ये घबराट, पाहा VIDEO

Goa News Live Updates: पर्ये मॅनेजमेंट कॉलेज जवळ रात्री चाकू हल्ला

SCROLL FOR NEXT