waterfall Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Goa Waterfall: काणकोणातील बामणबुडो धबधबा पर्यटकांचे आकर्षण

Plan Goa Trip In Monsoon: सुट्टीच्या दिवशी शेकडो देशी व परदेशी पर्यटक (Tourist) या धबधब्याला भेट देऊन आनंद लुटतात.

दैनिक गोमन्तक

काणकोण हा राज्‍यातील टोकाचा तालुका असल्याने एकेकाळी लोक कुत्‍सितपणे ‘काणकोण, जाणा कोण'' असे म्हणायचे. पण आता हेच काणकोण किनारी पर्यटन व निसर्ग पर्यटनामुळे उभारी घेत आहे.

निसर्गरम्य पाळोळे, आगोंद समुद्रकिनाऱ्यांमुळे काणकोण तालुका जगाच्या पर्यटन नकाशावर पोचला आहे. त्याच्या जोडीलाच आता निसर्ग पर्यटनही उभारी घेत आहे. पावसाळी पर्यटन बहरू लागले आहे. धबधबे या तालुक्यासाठी वरदान ठरू लागले आहेत. गावडोंगरी पंचायत क्षेत्रातील गावडोंगरी ते नेत्रावळी या आंबेघाटातील रस्त्याच्या कडेला असलेला बामणबुडो धबधबा पावसाळ्यात ओसंडून वाहू लागला आहे.

सुट्टीच्या दिवशी शेकडो देशी व परदेशी पर्यटक (Tourist) या धबधब्याला भेट देऊन आनंद लुटतात. या धबधब्याच्या (Waterfall) जवळच तुडल येथे दुसरा धबधबा आहे, मात्र तो आडवाटेला असल्याने पर्यटक बामणबुडो धबधब्‍यालाच पसंती देत आहेत.

खोतीगाव अभयारण्याच्‍या कक्षेत कुस्केचा धबधबा आहे. कुस्के येथे ज्या ठिकाणी डांबरी रस्ता संपतो, तेथून धबधब्याकडे जाण्यासाठी पायवाटेने सुमारे 20 मिनिटे चालल्यानंतर सुमारे 25 मीटर उंचीवरून कोसळणारा जलप्रपात पर्यटकांचे (Tourist) लक्ष वेधून घेतो. या धबधब्याकडे जाण्यासाठी परवानगी घेऊन शुल्क भरावे लागते.

संध्याकाळी सहा वाजेपर्यंत धबधब्याकडे जाण्यास वन खात्यातर्फे परवानगी दिली जाते. चावडी येथून हा धबधबा सुमारे 20 किलोमीटर अंतरावर आहे. मडगाव-कारवार जुन्या हमरस्त्याने पर्तगाळ येथे आल्यानंतर वन खात्याच्या खोतीगाव अभयारण्याच्या प्रवेशद्वाराने आत शिरल्यावर काही अंतरावर खोतीगाव अभयारण्य कार्यालय आहे. या कार्यालयात चौकशी करून कुस्के धबधब्याकडे प्रयाण करता येते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mhaje Ghar: 'माझे घर'चे अर्ज सोमवारपासून उपलब्ध; योजना सामान्यांपर्यंत पोहोचवा, CM प्रमोद सावंतांच्या अधिकाऱ्यांना सूचना

Goa Teacher Recruitment: 'टीईटी'अभावी शिक्षक उमेदवारांची जाणार संधी, परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे 'प्रमाणपत्र' सादर करणे अनिवार्य

Illegal Spa Goa: मसाज पार्लरच्‍या नावाखाली कोलव्यात वेश्‍‍याव्‍यवसाय, दोन पार्लरवर छापे; 9 युवतींची सुटका

Mapusa Theft: म्हापशातील सशस्त्र दरोडा; दोन दिवस उलटले, अद्याप धागेदोरे नाहीत; पोलिसांची आठ पथके मागावर

PM Narendra Modi: काँग्रेसनेच लष्कराला हल्ल्यापासून रोखले, '26-11'बाबत पंतप्रधान मोदींची टीका

SCROLL FOR NEXT