Midnight Hunger Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Midnight Hunger: तुम्हीही रात्री- अपरात्री जेवण करताय? तसं असेल तर आत्ताच ही सवय बंद करा, कारण...

Midnight Hunger: जेवणाच्या आणि झोपण्याच्या मध्ये किमान 2 तासांचे अंतर असावे.

Ganeshprasad Gogate

Midnight Hunger: अनेकजणांना रात्री उशीरा जेवायची सवय असते. प्रवासामध्ये होणारा उशीर, ट्रॅफिक, डेडलाईन्स, कामाचा ताण या सगळ्यामध्ये बऱ्याचदा जेवणासाठी उशीर होतो.

कामामुळे कधीकधी जेवायला उशीर होणे साहजिक आहे, पण काहीजणांना रोज रात्री उशीरा जेवायची सवय लागते.

पण रात्री उशीरा जेवल्यामुळे आरोग्यावर त्याचा काय परिणाम होतो हे अनेकांना माहित नसते. तज्ञांच्या मतानुसार रात्री 8 वाजल्यानंतर जेवणे आरोग्यासाठी नुकसानकारक ठरू शकते.

जेवणाच्या आणि झोपण्याच्या मध्ये किमान 2 तासांचे अंतर असावे. रात्री उशीरा जेवल्याने पचनाबरोबर आणखी कोणत्या समस्या उद्भवू शकतात जाणून घ्या.

वजन वाढणे:

रात्री उशीरा जेवल्याने वजन वाढू शकते. अनेकांना डाएट करून किंवा नियमित व्यायाम करूनही वजन कमी करण्यात यश मिळत नाही, याचे कारण रात्री उशिरा जेवणे असू शकते. रात्री जेवणाच्या आणि झोपण्याच्या मध्ये किमान 2 तासांचे अंतर असावे.

झोप पूर्ण न होणे :

रात्री उशीरा जेवल्याने शरीरातील नैसर्गिक पचन प्रक्रियेवर त्याचा परिणाम होऊन, झोपल्यावर तुम्हाला अस्वस्थ वाटू शकते. त्यामळे झोप पूर्ण न होण्याची समस्या उद्भवू शकते.

रक्तदाब अनियंत्रित होणे :

रात्री उशीरा जेवल्याने रक्तदाब अनियंत्रित होण्याची शक्यता असते. तसेच यामुळे मधुमेह, कोलेस्ट्रॉल वाढणे अशा समस्याही उद्भवू शकतात. त्यामुळे रात्री उशीरा जेवणे टाळावे.

पचनाशी निगडित समस्या :

रात्री उशीरा जेवल्यानंतर लगेच झोपल्यामुळे पचनाशी निगडित समस्याही उद्भवू शकतात.

शरीरातील ऊर्जा कमी होणे :

रात्री उशीरा जेवल्याने दुसऱ्या दिवशी सकाळी बद्धकोष्ठता, डोकेदुखी किंवा इतर काही समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे शरीरातील ऊर्जा कमी झाल्याचे जाणवते.

(वरील सर्व माहिती ही विविध स्रोतांमधून घेण्यात आली असून यामधून दैनिक गोमंतक कोणताही दावा करत नाही)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: समुद्रात तरंगू लागले आयफोन अन् लक्झरी परफ्यूमचे बॉक्सेस! होर्मुझ सामुद्रधुनीत भीषण अपघात; जहाजावरील 21 जणांचा जीव थोडक्यात वाचला

DA Hike: कॅबिनेट बैठकीत DA बाबत मौन! केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता दिवाळीची प्रतीक्षा; महागाई भत्त्यावर अजूनही सस्पेन्स कायम

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

Goa Ranji Trophy 2026: बडोद्याकडून पराभवाचा झटका; मोहित रेडकर, दीपराज गावकर यांना गोव्याच्या रणजी संघातून डच्चू!

Mahindra XUV 3XO CNG : महिंद्राची नवी CNG SUV बाजारात; 9.99 लाखांपासून किंमत, दमदार लूकसह टाटा नेक्सॉन आणि ब्रेझाला देणार टक्कर

SCROLL FOR NEXT