Goa: The man who changed after Covid Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Goa: कोरोनाने घालून दिलेले धडे

Goa: कोविडमुळे (Covid19) जगभरात अनेक बदल झाले, त्यांचा झालेला परिणाम, बदलेली माणसे, माणसांनी सुरू केले उद्योग याबद्दल...

Sanjay Ghugretkar

एखादे संकट येते, तेव्हा त्याच्या बरोबर चांगली शिकवणही मिळते, काही चांगल्या प्रथाही अंगवळणी पडतात. सध्या आलेली कोरोना लाट ही देशांच्या (Goa) सीमारेषा झुगारून सगळीकडे आक्रमण करत सुटली. घराघरांतून तिने प्रवेश केलाय. कोणीच तिच्या तावडीतून सुटलं नाही. आत्तापर्यंत माणसाने अनेक संकटे झेलली. अनेक प्रलय भोगले, भूकंप पचवले, वणवा, सुनामी, ढगफूटी, ज्वालामुखी, सारख्या नैसर्गिक आपत्तींना तोंड दिलं. अणु बॉम्बस्फोट रिचवला, महामारी, प्लेग, देवी या सारख्या साथीवर उपाय योजले आणि या सर्व संकटाने माणसाची प्रतिकार शक्ती वाढवली त्यातून तरून जायचे मार्ग त्याने आपल्या बुद्धिमत्तेचे शोधून काढले. तसाच परिणाम कोरोनाचाही पाहायला मिळतोय. कोरोनामुळे जगभरची माणसे एकत्र येऊन त्यावर प्रतिबंधक उपाय शोधण्याची पराकाष्ठा करताना दिसतात. कमी अधिक त्रास तर सगळ्यांनाच सोसावा लागतोय. त्याला काबूत आणण्यासाठी माणसे जवळ येत एकमेकांना आधार देवू शकत नसली तरी इंटरनेट, (Internet) मोबाईलद्वारा (mobile) एकमेकांशी जोडली जात आहेत. जवळचीच नव्हे, तर दूरची माणसे ही आपल्या परिघात येत आहेत. हा एक फायदाच म्हणाला लागेल. निदान दुरून तरी तुम्ही कसे आहात, आम्ही ठीक आहोत, हा विचार मायेचा ओलावा दर्शवत आधार देवून जातो.
आपला देश हा समूहाने एकत्र येऊन उत्सव सण (Festival) साजरे करणारा देश. अर्थात हा गुण जरी चांगला असला तरी त्यातून सध्या आलेल्या महामारीने उग्र स्वरूप धारण केले. त्यामुळे लॉकडाउनचे पाऊल उचलले गेले त्यामुळे आपोआपच सार्वजनिक ठिकाणी एकत्र येण्यावर बंधने आली आणि सोशल डिस्टन्सिंग साधले गेले. (Mobile) (festivals) विविध उत्सव, सणात गणेशोत्सव, ईद, होळी, दहीहंडी असे सर्व सार्वजनिक स्वरूपाचे उत्सव घरात राहून साजरे (celebrations) केले गेले. त्यामुळे होणारे ध्वनि प्रदूषण ट्रॅफिक जाम गर्दीमुळे होणारी चेंगराचेंगरी हे सर्व टाळले गेले आणि सण किंवा उत्सव असेही साजरे करू शकतो हे लोकांना पटले.
शहरातील कार्पोरेट नोकऱ्यातील बऱ्याच जणांनी वर्क फ्रॉम होम ही संकल्पना राबवली त्यामुळे नोकरीवर जाताना वापरावे लागणारे वाहन, त्याचा (petrol) पेट्रोलचा खर्च, ट्रॅफिक मध्ये अडकून वाया जाणारे दोन दोन तास या सर्वांचीच बचत होताना दिसते. लोक आपल्या गावी राहून काम करू लागली. शहरावरचा बोजा कमी होऊ लागला. मुंबई, पुणेसारख्या शहरात नोकरी करणारे आई-बाबा मुलांना शनिवार-रविवारच भेटत. रोज भेटायलाच त्यांना वेळ मिळत नसे, पण बरेच ठिकाणी घरून काम करत असल्याने घरच्यांशी संपर्क, सबंध आणि संवाद वाढलाय. मुलांना आपोआपच आई-वडील घरात असल्याने त्यांचे सहवाससुख अनुभवता येवू लागले. त्यामुळे पालकांचे आपल्या मुलांवर लक्ष राहू लागले. घरात काय काय कामे असतात आणि ती वाटून घेतली तर कित्ती सोप्पी होऊन जातात, याचेही काही जणांना ज्ञान प्राप्त झाले. घराची जबाबदारी एकट्या बाईने उचलायची नसते, तिला हातभार गरजेचा असतो. हे घरातल्या बाकीच्या माणसांना जाणवले. कोरोनापूर्वी घरातल्या माणसांकडे फारसे लक्ष देत नव्हते. एकत्र कुटुंबात घरात असलेल्या आई-वडील आज्जी-आजोबा यांच्याकडे कामाच्या नादात तसे दुर्लक्षच होत होते, पण कोरोना त्यांच्यासाठी अधिक धोकादायक ठरू लागल्याने आपोआपच त्यांची कळत नकळत का होईना काळजी घेतली जाऊ लागली, संकटाचे संधीत रूपांतर करून देणारे अनेक छोटे मोठे उद्योग फलित स्वरूपात सामोरे येवू लागले. घरच्या घरी करता येतील आणि त्यातून उत्पन्न सुद्धा मिळेल असे अनेक उद्योग लोकांसाठी उपयोगी ठरू लागले. घरोघरी सेवा पुरवणाऱ्या संस्था उदयास आल्या.


योग आयुर्वेद यांच्याशी जास्त जोडले गेलो. जे आपल्या प्राचीन ऋषी मुनींनी सांगून ठेवलं होतं ते आचरणात येवू लागलं. आधार देणाऱ्या खूप गोष्टी आणि माणसे आपल्या अवती भवति आहेत याची जाणीव झाली. हे ही दिवस जातील पुन्हा नवा सूर्योदय होईल. येणाऱ्या चांगल्या काळाची वाट पहा हा आशावाद मनाशी बाळगायला शिकवलं. आपलं घर आपली माणसं आणि स्वतः आपण यांची नव्याने ओळख करून दिली. कायदा पाळला पाहिजे त्यातच सर्वांचे हित आहे हे पटवून दिलं.
या संकट काळात अगदी अशिक्षित लोकांनीसुद्धा मोबाईलचा जास्तीत जास्त वापर करून नवीन आरोग्य सेतू सारखे अॅप माहीत करून घेतले गृह अलगीकरणात रहावं लागलं तर मोबाईल हाच एकमेकांशी दुवा साधण्याचं साधन बनलं त्यामुळे ते लोकांना शिकून घ्यावेच लागलं. घरात माणसे कोंडली गेली तर मनःस्वास्थ्य बिघडू शकतं अशावेळी मोबाईल वरुन दुसऱ्यांच्या संपर्कात असणं कधीही चांगलं, एक मानसिक आधार मिळतो. या दृष्टीने पाहिल्यास करोना हा साक्षात्कारी आहे. त्याने जगभरातील लोकांना नवीन गोष्टी शिकवल्या.
लॉक डाउन मध्ये सर्वांना घरात बसण्याचे आवाहन करण्यात आले आहे त्यामुळे संसर्गा पासून वाचण्यासाठी हे गरजेचे आहे. लॉकडाउनने सगळ्या जगाने जणू ‘पॉझ’ घेतला आहे, हालचाली गोठून गेल्या आहेत. एखादा वणवा जसं काही भक्ष मिळालं की पेटत जातो पसरत जातो तसा हा संसर्ग पसरत जातोय. या वणव्यात आपणही सहभागी व्हायचे का? स्वत: बरोबर आपल्या कुटुंबाची आणि इतर निरपराध्यांची होळी व्हावी का? याचा विचार करावा. स्वत:वर त्यासाठी काही मर्यादा घालून घेतल्या पाहिजेत कामाशिवाय उगाच बाहेर भटकायचे नाही जरुरी पुरतेच सामान खरेदी करायचे, काटकसर करायची. आर्थिक व्यवहार जरी काही काळापुरते ठप्प झाले असले तरी पुन्हा सुरळीत करता येतील, पण मनुष्य जिवांची हानी होता कामा नये. त्यासाठी आपले कुटुंब आपले नातेवाईक यांच्या जिवांचे रक्षण महत्त्वाचे आहे. कारण जीवनात आर्थिक सुरक्षा जितकी महत्त्वाची तितकीच कुटुंब सुरक्षितता ही महत्त्वाची असते. ‘सर्वे संतु निरामया’ हे तत्व मनाशी बाळगून सर्वांच्या खासगी आणि सार्वजनिक आरोग्याचे रक्षण करण्यासाठी सर्वांनी कटिबद्ध राहिलं पाहिजे. विश्वशांती, सद्‌भावना, वसुधैव कुटुंबकम अशा उदात्त भावना प्रत्येक देशवासियांच्या मनात उगम पावल्या. त्या बद्दल कोरोनाचे धन्यवाद मानले पाहिजेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Electricity: हायकोर्टाच्या 'शॉक'नंतर वीज विभागाला जाग, नवीन जोडणीसंदर्भात नियम होणार कठोर

Goa Baby Day Care Centre: नोकरदार पालकांसाठी खुशखबर! गोव्यात ९ ठिकाणी सरकारतर्फे पाळणाघर; केंद्रांची यादी, नियमावली वाचा

U19 Cooch Behar Trophy: द्विशतकी भागीदारीनं गोव्याला सतावलं, ॲरन-सिद्धार्थच्या शानदार खेळीच्या जोरावर हैदराबादनं गाठला मोठा टप्पा

Indian Super League 2024: ०-१ ने पिछाडीवर असलेल्या सामन्यात एफसी गोवाचं जबरदस्त कमबॅक, 'पंजाब'ला 'दे धक्का'

Goa Live Updates: २८ कोटीच्या इफ्फी खर्चाबाबत मुख्यमंत्र्यांनी खुलासा करण्याची गरज; आणि गोव्यातील काही रंजक बातम्या

SCROLL FOR NEXT