Diabetes Educators In Goa
सचिन कोरडे
मधुमेहींना नियमितपणे ‘मॉनिटर’ करण्याची गरज असते. बरेच रुग्ण आपल्या आरोग्याकडे नियमित लक्ष देऊ शकत नाहीत. अशा रुग्णांकडे खास लक्ष देण्यासाठी गोवा आरोग्य संचालनालयाने ‘डायबिटिस एज्युकेटर’ नेमले आहेत.
प्रत्येक तालुक्यात काही महत्त्वाच्या आरोग्य केंद्रांमध्ये हे ‘एज्युकेटर’ काम करीत असून त्यांच्याकडे अभ्यासपूर्ण असा ‘विशेष डाटा’ही तयार होत आहे. रुग्णांची नियमित चाचणी, त्यांचा आहार, आरोग्यात होणारे बदल तसेच औषध याकडे लक्ष देण्यासाठी या एज्युकेटरची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरत आहे. रक्तातील साखर कशी नियंत्रणात राहील याबाबत हे ‘एज्युकेटर’ मार्गदर्शन करतात.
यासंदर्भात, पणजीत झालेल्या एका कार्यक्रमात आरोग्य खात्याच्या संचालक डॉ. वंदना धुमे यांनी ‘गोमन्तक’शी संवाद साधला. त्या म्हणाल्या, ‘डायबिटिस एज्युकेटर’ ही संकल्पना गोवा राज्याने प्रभावीपणे राबविली आहे. त्याचा मधुमेहींना खूप लाभ होत आहे. प्रत्येक तालुक्यात आमचे एज्युकेटर आहेत. सध्या ही संख्या १५ एवढी आहे.
ते रुग्णांच्या नियमित संपर्कात असतात. नियमितपणे आरोग्याची तपासणी, आहार तसेच आरोग्य सल्ला देण्याचे काम करतात. राज्यातील मधुमेहींचा अभ्यास करण्यातही या एज्युकेटरची भूमिका महत्त्वाची ठरत आहे. राज्यातील मधुमेहींची वाढती आकडेवारी ही चिंजाजनक असून संख्या वाढण्यास अनेक कारणे आहेत. मधुमेहाबाबत जागृती वाढवणे गरजेचे बनले आहे.
मधुमेही रुग्णांसाठी औषधांप्रमाणेच योग्य आहार अत्यंत महत्त्वाचा असतो. रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवणे हे मुख्य उद्दिष्ट असले तरी, मधुमेहामुळे वाढणारी गुंतागुंत टाळण्यास मदत करणारे पदार्थ खाणे म्हणजे या रुग्णांसाठी औषधच. त्यामुळे तुमची ‘हेल्दी प्लेट’ कशी असावी, याचा अभ्यास करण्यात आला आणि ही खास प्लेटही तयार केली. पणजीत झालेल्या डायबिटीसवरील एका कार्यक्रमात या प्लेटबद्दल माहिती देण्यात आली.
डॉक्टरांच्या मते, आपल्या प्लेटमध्ये ५०% नॉन-स्टार्च भाज्या (उदा. कोबी, पालक, वांगी इत्यादी) असाव्यात, २५% प्रथिनयुक्त पदार्थ (उदा. अंडी, पनीर, सोया, चरबीविरहित मांस) आणि २५% स्टार्चयुक्त अन्नपदार्थ (उदा. गोड बटाटा, अनपॉलिश्ड तांदूळ, ओट्स किंवा बाजरी) असावेत. तसेच, हेल्दी फॅट्स, पाणी, कमी फॅटचे दूध किंवा दही यांचाही समावेश करावा, अशी हेल्दी प्लेट रोजच्या आहारात असेल तर तुम्ही निश्चितपणे मधुमेहावर नियंत्रण मिळवू शकता.
साखरयुक्त पदार्थ आणि पेये : कँडीज, कुकीज, केक, शर्करायुक्त
पेये आणि सोडा.
प्रक्रिया केलेले कार्बोहायड्रेट जसे की पांढरा ब्रेड, पांढरा तांदूळ आणि साखरयुक्त तृणधान्ये रक्तातील साखर वेगाने वाढवू शकतात.
फास्ट फूड, तळलेले स्नॅक्स आणि विशिष्ट पॅकेज केलेले जेवण.
फळांचे रस : फळांच्या रसामध्ये संपूर्ण फळांमध्ये आढळणाऱ्या फायदेशीर फायबरशिवाय एकाग्र साखर असू शकते. संपूर्ण फळे मध्यम प्रमाणात खाणे चांगले.
तळलेले पदार्थ : फ्रेंच फ्राईज, तळलेले चिकन आणि पिठलेले पदार्थ यांसारखे जास्त चरबीयुक्त तळलेले पदार्थ वजन वाढण्यास कारणीभूत ठरू शकतात.
माशांचे फॅटी कट्स : माशांच्या फॅटी कट्सपेक्षा पातळ प्रथिने स्रोतांचा पर्याय निवडा, जे जास्त प्रमाणात सेवन केल्यावर हृदयविकाराचा धोका वाढू शकतो.
अल्कोहोल : जास्त प्रमाणात मद्यपान केल्याने रक्तातील साखरेची पातळी कमी-जास्त होऊ शकते आणि मधुमेहावरील औषधांमध्ये व्यत्यय येऊ शकतो.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.