Goa Tourist Places Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Goa Tourist Places : गोव्यातील या पर्यटनस्थळांना भेट देऊन वाढेल तुमच्या सहलीचा आनंद!

गोवा हे देश-परदेशातील पर्यटकांचे आवडते पर्यटन ठिकाण आहे.

Kavya Powar

Goa Tourist Places : गोवा हे देश-परदेशातील पर्यटकांचे आवडते पर्यटन ठिकाण आहे. म्हणूनच गोव्याला पर्यटनाची राजधानी म्हणून देखील ओळखतात. गोव्यात अशी अनेक ठिकाणे आहेत जिथे तुम्ही तुमच्या मित्र परिवरसह ट्रीपसाठी जाऊ शकता. यामध्ये अनेक नैसर्गिक ठिकाणांचा तसेच समुद्र किनाऱ्यांचा समावेश होतो.

दूधसागर धबधबा

उंचीच्या बाबतीत, हा धबधबा जगातील 227 वा सर्वात उंच धबधबा म्हणून ओळखला जातो. या धबधब्याला ‘सी ऑफ मिल्क’ या नावानेही ओळखले जाते. हा धबधबा गोव्यातील सर्वात खास आणि लोकप्रिय ठिकाणांपैकी एक मानला जातो. त्याची उंची 1,020 मीटर आहे. उन्हाळ्यात आणि पावसाळ्यात या धबधब्याच्या सौंदर्याचा आनंद घेण्यासाठी बहुतांश लोक येतात.

हणजूणे समुद्रकिनारा

गोव्यातील हणजूणे समुद्रकिनारा सर्वोत्तम ठिकाणांपैकी एक आहे. दिवसा, हा भव्य समुद्रकिनारा त्याच्या चमकत्या पांढऱ्या वाळूने भरलेला आहे आणि संध्याकाळी या समुद्रकिनाऱ्यावर आल्यावर अतिशय मोहक नाईट लाईफचा आनंद घेता येतो.

मंगेशी मंदिर

मंगेशी मंदिर हे गोव्यातील प्राचीन शिवमंदिर आहे. गोव्यातील प्राचीन मंदिरांपैकी हे एक मंदिर आहे. जरी आपण धार्मिक यात्रा करत नसला तरी येथे भेट द्यावी. येथील सात मजली दिव्यांची भींत आकर्षित करते. इथे शांत जागेत बसून आपण ध्यानमग्न होऊन शकता. एक वेगळाच अनुभव येथे अनुभवाल.

जुने गोवा

जुने गोवा हे गोव्यातील भेट देण्यासाठी उत्तम स्थळ आहे. इथल्या काही इमारती आता पुरातत्त्वे संग्रहालये बनल्या आहेत आणि गोवाच्या इतिहासाचे आकर्षक प्रदर्शन प्रदान करतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Gavandali: गवंडाळीतील उड्डाण पुलाच्या कामाला गती द्या! प्रवाशांची मागणी;अरुंद रस्त्यावर अडथळा, वाहनचालकांना त्रास

Goa News Live Updates: अनमोड घाटातील रस्ता खचला, वाहतुकीवर परिणाम शक्य

Goa Politics: केजरीवालांच्‍या ‘एकला चलो’चा गोव्‍यावर परिणाम? राजकीय वर्तुळात चर्चा; युतीशिवाय पर्याय नसल्याचे विरोधकांचे मत

No Bag School Goa: गोव्यात भरते ‘बिनदप्तरी शाळा’! कुडचडेच्या ‘सीटीएन’ शाळेचा उपक्रम; विद्यार्थी लुटतात आनंद

Shwetakshi Mishra: अभिमान! श्वेताक्षी मिश्रा यांना उत्तर धृवावर संशोधनाची संधी; ग्रीष्मकालीन तुकडीत सहभाग

SCROLL FOR NEXT