Qualities for Good Husband Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Qualities for Good Husband: लग्नासाठी मुलांमध्ये 'हे' गुण शोधतात मुली; तुमच्यात आहेत का?

5 बेसिक गोष्टी मुलामध्ये असतील तर मुली लग्नाला वेळ लावत नाहीत

गोमन्तक डिजिटल टीम

Qualities for Good Husband: आजकाल मुला-मुलींची मैत्री ही सोपी गोष्ट असली तरी जेव्हा लग्नाचा विषय येतो, तेव्हा मुली चुझी होतात. लग्नाचा निर्णय विचार करून घेण्यास मुली प्राधान्य देतात. एखाद्या मुलाला जीवनसाथी म्हणून निवडण्यासाठी मुली त्याच्यामध्ये 5 बेसिक गोष्टी शोधतात. आणि ज्या मुलामध्ये या बाबी असतील त्याला लाईफ पार्टनर बनविण्यात त्या वेळ घालवत नाहीत. जाणून घेऊया, ते 5 गुण. (Relationship Tips)

नात्यांत बरोबरीचा सन्मान देणारा

आयुष्यभर बरोबरीचा दर्जा देणारा लाईफ पार्टनर मुलींना हवा असतो. पार्टनरने तिच्यावर कधीही वर्चस्व गाजवू नये, असे तिला वाटते. मुलींचा सन्मान करणारी मुले मुलींना आवडतात. तिच्यावर उगाच स्वतःचे श्रेष्ठत्व लादणारी मुले मुलींना आवडत नाहीत.

जबाबदारी घेणारा

मनमोकळा आणि जबाबदार लाईफ पार्टनर मुलींना आवडतो. घर, कुटुंब आणि कामाची जबाबदारी जी मुले गांभीर्याने पार पाडतात, अशा मुलांवर मुली फिदा होतात. तर बेपर्वा वर्तन असणारी तसेच मंदबुद्धी मुलांपासून मुली चार हात लांबच राहणे पसंत करतात.

नात्यातील विश्वास जपणारा

लग्नाबाबत मुलींची एक कॉमन अट असते की, मुलगा विश्वासू असावा. तो तिच्यप्रती प्रामाणिक असावा, त्याचे इतरत्र कुणाशी एक्स्ट्रा रिलेशन असू नये. सगळीकडे फ्लर्ट करणाऱ्या आणि मुलींसमोर हीरोगिरी करणाऱ्यांना मुली भाव देत नाहीत, अशा मुलांचा त्या कधीही लग्नासाठी विचार करत नाहीत.

तिचे म्हणणे ऐकुन घेणारा

स्वतःच्या मनातील सांगणारा आणि मुलीचे म्हणणे ऐकणारा मुलगा मुलींना हवासा वाटतो. जी मुले केवळ स्वतःचे मत सांगून निघून जातात, आणि दुसऱ्यांचे ऐकत नाहीत, अशा मुलांना मुली लग्नासाठी रिजेक्ट करतात.

महिलांचा सन्मान करणारा

मुली, महिलांचा सन्मान करणारी मुले, त्यांच्याशी चांगल्या शब्दांत बोलणारी मुले मुलींना आवडतात. कारण मुलींना स्वतःचा आत्मसन्मान महत्वाचा वाटतो, आत्मसन्मनाशी त्या तडजोड करू इच्छित नाहीत. सहकार्याची भावना असणाऱ्या मुलांवर मुली लट्टू होतात.

तर हे गुण असणाऱ्या मुलांना जीवनसाठी बनविण्याचे स्वप्न मुली पाहत असतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT