Research: पुरुषांपेक्षा महिलांमध्ये डोकेदुखीची समस्या अधिक

महिलांनाच का डोकेदुखीचा त्रास होतो, वाचा रिसर्चमध्ये काय सांगितले आहे.
headache
headacheDainik Gomantak
Published on
Updated on

जगात अनेकांना डोकेदुखीचा त्रास होतो. डोकेदुखी (Headache) ही एक सामान्य समस्या आहे. पण बऱ्याच लोकांना तीव्र डोकेदुखीची समस्या असते. नुकताच नॉर्वेजियन युनिव्हर्सिटी ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजीच्या शास्त्रज्ञांनी अशा रुग्णांच्या डेटाबाबत मोठा खुलासा केला आहे.

रिसर्चर्सचे म्हणणे आहे की जगातील 52% लोकांना दरवर्षी कोणत्या ना कोणत्या प्रकारच्या डोकेदुखीचा त्रास होतो. यामध्ये मायग्रेन, सामान्य डोकेदुखी, टेंशनमुळे होणारी डोकेदुखी इ. समावेश आहे. या संशोधनासाठी शास्त्रज्ञांनी 1961 ते 2020 पर्यंतच्या संशोधनांचा अभ्यास केला, ज्यामध्ये डोकेदुखीशी संबंधित माहिती उपल्बध होता.

  • मायग्रेनची समस्या असलेले 14% तर 26% लोक टेंशनमुळे होणारी डोकेदुखीने ग्रस्त

शास्त्रज्ञांनी संशोधनात सांगितले की जगातील 14% लोक मायग्रेनचे रुग्ण आहेत. तर 26% लोक टेंशन घेतात की ते गंभीर डोकेदुखीचे कारण बनते. संशोधनानुसार, जगातील 15.8% लोकांना दररोज डोकेदुखीचा त्रास होतो.

headache
Morning Tips: सकाळी उठल्यावर हे काम केल्यास घरात राहील लक्ष्मीचा वास
  • महिलांमध्ये डोकेदुखीची समस्या अधिक

रिसर्चर्सच्या मते पुरुषांपेक्षा महिलांना (Women) सर्व प्रकारच्या डोकेदुखीचा त्रास होतो. मायग्रेनबद्दल सांगायचे तर, जगभरात 17% महिला या आजाराला बळी पडतात, तर केवळ 8.5% पुरुषांना याचा त्रास होतो. सुमारे 6% महिलांना सलग 15 दिवस किंवा त्याहून अधिक दिवस डोकेदुखीचा त्रास असते, तर पुरुषांमध्ये ही टक्केवारी केवळ 2.9% आहे.

ग्लोबल बर्डन ऑफ डिसीजने 2019 मध्येही असाच स्टडी केला होता. त्यात असे आढळून आले की मायग्रेन हे जगभरातील अपंगत्वाचे दुसरे प्रमुख कारण आहे. 50 वर्षांखालील महिलांमध्ये अपंगत्वाचे पहिले प्रमुख कारण आहे.

  • लोकांमध्ये मायग्रेन वाढण्याची अनेक कारणे

दरवर्षी मायग्रेनची समस्या लोकांमध्ये वाढत आहे. यामागे अनेक कारणे असल्याचे संशोधनात सहभागी संशोधकांचे म्हणणे आहे. हे मानसिक ते शारीरिक, पर्यावरणीय, वर्तणुकीशी आणि मानसिक पर्यंत असू शकतात. पण यामध्ये टेक्नोलॉजी महत्त्वाची भूमिका बजावते. आज टेक्नोलॉजीच्या सहाय्याने अधिकाधिक लोक आपल्या समस्या डॉक्टरांशी शेअर करत आहेत आणि आरोग्य तज्ञही नवीन तंत्रज्ञानाद्वारे रुग्णांवर उपचार करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com