Ghee is beneficial for dieting | Health Tips  Dainik Gomantak
लाइफस्टाइल

डाएटिंगसाठी तुप ठरते फायदेशीर!

देसी तूप हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. तूप जेवणाची चव तर वाढवतेच, पण शरीरातील वाढलेली चरबी कमी करण्यासही मदत करते.

दैनिक गोमन्तक

तुपाचे फायदे: देशी तूप हे नेहमीच आरोग्यासाठी चांगले मानले गेले आहे कारण त्यात अनेक पौष्टिक घटक आढळतात. देसी तूप प्रत्येक फिटनेस फ्रिक व्यक्तीसाठी फायदेशीर आहे. त्यामुळे स्नायू वाढण्यास मदत होते. पण काही लोकांमध्ये असलेल्या हेल्दी फॅटबद्दल संभ्रम असतो की, देसी तुपाचे सेवन खरोखरच इतके फायदेशीर आहे की वजन कमी करण्यात मदत होते. डाएटिंग करताना वजन कमी करण्यासाठी तूप हे खुप प्रभावी आहे.

(Ghee is beneficial for dieting)

देशी तुपाचे फायदे

नेटमेड्सच्या मते, तुपात लिनोलिक अ‍ॅसिड मुबलक प्रमाणात आढळते, जे वजन कमी करण्यासाठी उपयुक्त मानले जाते. देसी तुपात आढळणारे सॅच्युरेटेड फॅट शरीरातील चरबी कमी करण्यास मदत करते. यासोबतच तुपाचे सेवन केल्याने चयापचय देखील वाढतो, ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. (Health Tips In Marathi)

तुपात ओमेगा-3 फॅटी अ‍ॅसिड, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते, जे तुमच्या शरीराला आवश्यक पोषक तत्वे शोषून घेण्यास आणि ऊर्जा पुरवण्यास मदत करते.

तुपामध्ये दाहक-विरोधी गुणधर्म देखील असतात जे शरीरातील सूज टाळतात. तसेच हे हार्मोन्स समतोल राखण्यासाठी खूप महत्त्वाचे मानले जातात.

तूप डोकोसाहेक्साएनोइक ऍसिडचा चांगला स्रोत म्हणून ओळखला जातो. ओमेगा 3 फॅटी ऍसिड डोकोसाहेक्साएनोइक ऍसिडमध्ये आढळतात. हे आपल्या शरीरात तयार होत नाही, म्हणून ते अन्नाद्वारे घेणे आवश्यक आहे. DHA कर्करोग, हृदयविकाराचा झटका, इन्सुलिन प्रतिरोधकता, संधिवात आणि अटेंशन डेफिसिट हायपरएक्टिव्हिटी डिसऑर्डर यांसारख्या समस्यांचा धोका कमी करण्यासाठी उपयुक्त आहे. मन शांत करून स्मरणशक्ती वाढवण्यासही तूप मदत करू शकते. काही लोकांना वारंवार उचकी येण्याचा त्रास होतो, त्यांनी एक चमचा तूप खाल्ल्याने त्यांना उचकीपासून आराम मिळतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: पार्किंगचा वाद विकोपाला गेला, पर्ये सत्तरीत दोन तरुणांमध्ये तुंबळ हाणामारी; एकाला अटक

Pandharpur Wari: गोव्यातून पंढरपूरला जाऊन यायला दीड महिना लागायचा, परतल्यावर गावातील लोक भजन करीत त्यांना घरी न्यायचे

Goa News Live Updates: महिना उलटला पण कचरा तसाच

Ivory Suggling Khanapur: खानापूरमध्ये गुन्हे शाखेची मोठी कारवाई, हस्तिदंत तस्करी करणाऱ्या रॅकेटचा केला पर्दाफाश; 7 हस्तिदंतांसह तिघांना अटक

दोनवेळा घर कोसळले, मदत नाही फक्त आश्वासनं मिळाली; कोलवाळमधील 65 वर्षीय महिलेचा एकाकी संघर्ष

SCROLL FOR NEXT