Geyser Care Tips Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Gas Geysers: गॅस गीझर सुरू करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या

जर तुम्ही हिवाळ्यात गरम पाण्यासाठी गॅस गिझचा वापर करत असाल तर पुढील गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे.

Puja Bonkile

Gas Geysers: थंडीच्या दिवसांना सुरूवात झाली आहे. यामुळे अनेक लोक थंड पाण्याएवजी गरम पाण्याचा वापर करतात. तुम्ही जर गरम पाण्यासाठी गॅस गिझरचा वापर करत असाल तर काळजी घ्यावी. कारण गॅस गिझर वापरताना निष्काळजीपणामुळे अपघात होऊ शकतो. यामुळे हिवाळ्यात कोणती काळजी घ्यावी हे जाणून घेऊया.

तज्ज्ञांच्या मते बहुतेक लोक बाथरूममध्ये गॅस गिझर सुरू ठेवतात. अशावेळी बंद बाथरूममध्ये ऑक्सिजनचा वापर झपाट्याने वाढतो. श्वसनाच्या रुग्णांसाठी हे अत्यंत धोकादायक असु शकते. त्यामुळे ऑक्सिजनची कमतरत जाणवू शकते. अशावेळी अनेक वेळा लोक बेशुद्ध होतात. ऑक्सिजन वेळेत न मिळाल्यास जीव जाऊ शकतो.

  • गॅस गिझरमुळे या समस्या वाढतात

गॅस गीझर देखील तुमच्या आरोग्यासाठी धोकादायक आहे. त्यामुळे शरीरातील ऑक्सिजनची पातळी कमी होते. याचे कारण हायपोक्सिया असू शकते. त्याचा थेट परिणाम हृदय, मेंदू आणि फुफ्फुसावर होतो. याचे कारण ऑक्सिजनची कमतरता आहे. ज्यामुळे ऊतींचे नुकसान होते. त्यामुळे श्वासाचा वेग वाढू लागतो. त्यामुळे शरीराला थकवा येऊ लागतो. शरीरातील अवयवही कमकुवत होऊ लागतात.

  • बाथरूममध्ये गॅस गिझर लावू नये

तज्ज्ञांच्या मते, बाथरूममध्ये गॅस गिझर लावू नये. हे बाथरूमच्या बाहेर किंवा बाल्कनीमध्ये स्थापित केले जाऊ शकते. विशेषत: एपिलेप्सी, पार्किन्सन्स किंवा फेफरेचा रुग्ण घरात असेल तर चुकूनही बंद बाथरूममध्ये गॅस गिझर लावू नका. यामुळे, या लोकांमध्ये ऑक्सिजनच्या कमतरतेचा धोका जास्त असतो, जो जीवघेणा ठरतो. 

  • गॅस गिझर वापरताना ही खबरदारी घ्या

बाथरूमऐवजी ज्या ठिकाणी हवा चांगली खेळती असेल अशा ठिकाणी गॅस गीझर लावावा. याशिवाय बाथरूमपासून थोड्या अंतरावर गॅस सिलिंडर लावावे. चुकूनही आत ठेवू नका. 

बाथरुममध्ये जाळीदार खिडकी असल्यास ती झाकून ठेवू नका. यामुळे हवेवर परिणाम होतो, जो तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकतो. 

जर तुमच्या घरात गॅस गिझर असेल तर बाथरूममध्ये जाण्यापूर्वी बादली किंवा टबमध्ये गिझरचे पाणी भरून ठेवावे. यानंतर आंघोळीसाठी आत जावे. 

गॅस गिझरमधून कार्बन मोनोऑक्साइड बाहेर पडतो. सुरुवातीला त्याचा वास फारसा जाणवत नाही, पण लवकरच त्याचा वास खूप तीव्र होतो. त्यामुळे गुदमरायला सुरुवात होते. 

  • अडचणीच्या वेळी हे काम ताबडतोब करा

बाथरूममध्ये गॅस गिझर लावले असेल तर तुम्ही आंघोळ करण्यापूर्वी ते सुरू केले पाहिजे. यामुळे तुम्हाला श्वास घेण्यास त्रास होणार नाही.

बाथरुममध्ये वायुवीजन नसले तरी ते करून घ्यावे. असे न करणे तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकते. 

जर तुम्ही घर बांधत असाल तर बाथरूमचा दरवाजा बाहेरून उघडेल असे बनवावे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT