Gardening Tips Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Gardening Tips: घराच्या गार्डनमध्ये वाढवा 'हा' महागडा मसाला

तुम्हालाही जर घरच्या गार्डनमध्ये केशरच्या रोपांची लागवड करायची असेल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे.

Puja Bonkile

Gardening Tips: मार्केटमध्ये उपलब्ध असलेल्या मसाल्यांमध्ये केशर हा सर्वात मौल्यवान मसाला आहे. केशर सर्वाधिक किमतीला विकला जातो हे सर्वांनाच माहिती आहे. यामुळे तुम्हालाही असे वाटत असेल की घरीच केशर वाढवला तर पैशांची बचत होईल. जर तुम्ही हा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. वैज्ञानिक तंत्राचा वापर करून तुम्ही घरच्या कार्डनमध्ये केशर वाढवु शकता.

आपण केशर महाग असल्यामुळे फक्त सणासुदीला गोड पदार्थ बनवल्यावर केशर घरी आणतो. केशर तुमच्या पदार्थांची चव वाढवतो पण खिशा देखील रिकामा करतो. चला तर मग जाणून घेऊया घरी केशर कसा वाढवायचा.

अनुकूल हवामान आणि योग्य मातीमुळे भारतातील काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि कर्नाटकच्या काही भागात केशराची लागवड केली जाते. जर तुम्ही घरामध्ये असेच वातावरण तयार करण्यात यशस्वी झालात, तर तुम्ही तुमच्या बागेतील सर्वात महाग मसाले अर्ध्या किमतीत वाढवू शकता.

केशरचे रोप लावण्याची पद्धती

सर्वात पहिले नर्सरीमधुन केशर कंद खरेदी करावे.

कंद जमिनीत 8 ते 13 सेमी खोलवर आणि किमान 10 सेमी अंतरावर लावावे.

केशरचे रोपामध्ये खत घालण्याची गरज नाही, कारण त्यांना जमिनीतून पुरेसे पोषक तत्व मिळतात.

केशराची फुले ऑक्टोबर ते नोव्हेंबर या कालावधीत येतात. सकाळी फुलांध्ये दिसणारे लाल पराग काळजीपूर्वक काढून घ्यावे.

केशरचे रोप वाढवण्यासाठी थंड हवामान आवश्यक असते.

केशर रोपासाठी पाण्याचा निचरा होणारी, वालुकामय आणि चिकणमाती माती लागते. मातीचे पीएच मूल्य 6.5 ते 7.5 दरम्यान असावे.

केशर रोपाला दिवसातून किमान 6 तास सूर्यप्रकाशाची आवश्याकता असते.

हे केशर फुलांधील पराग वाळवून हवाबंद डब्यात साठवा.

Saffron

या गोष्टी ठेवा लक्षात

भारतात केशरच्या तीन प्रकारांची लागवड केली जाते. क्रीम केशर, अक्विला केशर आणि लच्छा केशर. तुमच्या आवडीच्या विविधतेनुसार तुम्ही बाजारातून केशराचे कंद खरेदी करू शकता.

माती सुपीक करण्यासाठी शेणखत मिक्स करावे. मातीमध्ये फॉस्फरस, नायट्रोजन आणि पोटॅशियम योग्य प्रमाणात टाकावे. जेणेकरून झाडाची कापणी होण्यापूर्वी सर्व खनिजे मिक्स होतात.

केशराची फुले तीन ते चार महिन्यांत काढणीसाठी तयार होतील. सूर्योदय ते रात्री १० वाजण्याच्या दरम्यान फुले तोडणे चांगले मानले जाते.

फुलांमधील लाल पराग काढून ते उन्हात वाळवावे.

एरोपोनिक्स तंत्र

तुम्ही केशरचे रोप वाढवण्यासाठी एरोपोनिक्स तंत्र वापरू शकता. एरोपोनिक्स हे एक तंत्र आहे ज्यामध्ये झाडे मातीऐवजी हवेत वाढतात. या तंत्रात, वनस्पतींच्या मुळांना ऑक्सिजन आणि पाणी पुरवण्यासाठी स्प्रे किंवा कारंजे वापरेल जातात.

एरोपोनिक्स तंत्रज्ञानाचे फायदे

मातीचा वापर कमी होतो. त्यामुळे पाण्याची बचत होते.

एरोपोनिक्स वनस्पतींना अधिक पोषक तत्वे वितरीत करण्यास मदत करते, त्यांची वाढ आणि विकास सुधारते.

एरोपोनिक्स वनस्पतींना रोग आणि कीटकांपासून संरक्षण करण्यास मदत करते.

एरोपोनिक्स तंत्राचा वापर करून उगवलेली केशर रोपे मातीत उगवलेल्या वनस्पतींपेक्षा अधिक जलद आणि सहज वाढू शकतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs AFG: भारतीय क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच घडला 'हा' चमत्कारीक रेकॉर्ड; रोहित-प्रसिद्ध कृष्णाचा मोठा धमाका! VIDEO

"काम लवकर पूर्ण करा, नाहीतर..."; सांकवाळमध्ये आंदोलनाचा उडणार भडका; एमईएस कॉलेजजवळील रस्ते कामातील विलंबावर नागरिकांचा संताप

Pakistan Bomb Blast: 'पहिला स्फोट झाला अन् मदत करायला गेले...', पाकिस्तानात बॅक-टू-बॅक धमाके; 7 जणांचा मृत्यू, 3 गंभीर जखमी

Goa Coal Mining: "गोव्यातून कोळसा हद्दपार करा!", गोवा फॉरवर्डने फुंकले आंदोलनाचे रणशिंग; सरकारला दिला थेट इशारा

Bangladesh Hindu Protest: "प्रभू श्रीरामांच्या प्रतिमेवर बूट ठेवून केली विटंबना..."; इस्लामिक कट्टरपंथियांविरोधात बांगलादेशात हिंदूंचा महाआक्रोश VIDEO

SCROLL FOR NEXT