Gardening Tips Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Gardening Tips: शमीचे रोप सुकल्यावर 'या' 3 चुका पुन्हा करू नका

Gardening Tips For Shami Plant: तुम्हाला जवळजवळ प्रत्येक घरात शमीचे रोप वाढेल. पण काही चुकांमुळे बागेत लावलेले शमीचे रोप सुकतात.

Puja Bonkile

gardening tips hacks foe shami plants growth read full story

हिंदू धर्मात शमीच्या रोपाला खास महत्त्व आहे. धार्मिक मान्यतेनुसार या रोपामध्ये शनिदेव वास करतात असे मानले जाते. त्याचबरोबर भोलेनाथांना शमीची पाने अतिशय प्रिय आहेत.

यामुळेच तुम्हाला जवळपास प्रत्येक घरात शमीचे रोप दिसेल. मात्र, काही छोट्या चुकांमुळे बागेत लावलेले शमीचे रोप सुकायला लागते. ते निरोगी ठेवण्यासाठी लोक अनेकवेळा जास्त प्रमाणात पाणी देतात. ज्यामुळे त्याच्या मुळांना नुकसान होते. तुमच्या कोणत्या चुकांमुळे शमीची रोप खराब होऊ लागतात. हे टाळण्याचे काय करावे हे जाणून घेऊया.

  • शमीचे रोप सावलीत ठेऊ नका

शमीचे रोप सावलीत ठेवण्याची चूक करू नका. शमीच्या झाडांना पुरेसा सूर्यप्रकाश लागतो. यामुळे जमिनीतील ओलावा कमी होतो आणि झाडाची मुळे कुजण्यापासून आणि सुकण्यापासूनही सुरक्षित राहू शकतात. म्हणून, शमीच्या रोपाला सूर्यप्रकाशात ठेवणे फार महत्वाचे आहे. तरच तुमची झाडे पूर्णपणे हिरवीगार दिसतील.

  • खत देण्याकडे द्यावे लक्ष

अनेकदा लोक त्यांच्या घरात झाडे लावतात. पण, त्याची योग्य काळजी घेऊ शकत नाही. वेळोवेळी खतांचा योग्य वापर केला जात नाही. ज्यामुळे झाडांमध्ये पोषक तत्वांची कमतरता निर्माण होते. अशा स्थितीत शेणखत व पाणी जमिनीत टाकावे. असे केल्याने खराब झालेले शमीचे रोप पुन्हा जिवंत होईल आणि वनस्पती निरोगी होऊ शकते.

  • पाणी अति देणे

जेव्हा शमीची झाडे सुकायला लागतात, तेव्हा लोक भरपूर पाणी देतात. त्यामुळे हिवाळ्यात झाडामध्ये पाणी जमा होते आणि काही वेळाने ते सडू लागते. याशिवाय झाडामध्ये बुरशीचे कारण जास्त प्रमाणात पाणी असणे हे देखील आहे. म्हणून सर्वात पहिले माती चेक करावी. जर त्यात ओलावा असेल तर कमी पाणी घालावे. यामुळे शमीचे रोप पुन्हा हिरवे होऊ शकते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

सा जुझे दी आरियाल पुन्हा चर्चेत; पंचायत समोरील संत जोसेफ यांच्या पुतळ्याची विटंबना करुन चोरी

'पाठीत खंजीर खुपसला पण काँग्रेससोबत एकत्र लढण्यास तयार'; आप नेते पालेकरांचे काँग्रेस नेत्यांना चर्चेचे आवाहन

India vs Pakistan: पाकड्यांचा पराभव अटळ! हेड-टू-हेड आकडेवारीत टीम इंडियाचा वरचष्मा, सूर्याची 'ब्लू आर्मी' करणार कमाल

Sanquelim Market Robbery: फसवणुकीचा नवा फंडा! साखळीत वृद्ध भाजीविक्रेत्या महिलेला दिवसाढवळ्या लुबाडले, लंपास केली सोन्याची पाटली आणि साखळी

Sonam Wangchuck Arrested: लेह हिंसाचारानंतर सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना 'NSA' अंतर्गत अटक

SCROLL FOR NEXT