Ganesh Chaturthi Special Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Ganesh Chaturthi Special: गणेश चतुर्थीला 'या' गोष्टीं दान केल्यास गणरायाची राहील कृपादृष्टी

गणेश चतुर्थीला काही गोष्टी दान केल्यास गणरायाची कायम कृपा तुमच्यावर राहते असे मानले जाते.

दैनिक गोमन्तक

Ganesh Chaturthi Special: गणेशोत्सव देशभरात मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. गणेशोत्सव 10 दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. मनोभावे गणपतीची पुजा केल्यास नोकरी, शिक्षण, सुख-समृध्दी लाभते आणि संकट दूर होते. गणेश चतुर्थीच्या दिवशी विशेष उपाय करू शकता. आज आम्‍ही तुम्‍हाला श्रीगणेशाला प्रसन्न करण्‍यासाठी अशाच काही खास उपायांबद्दल सांगत आहोत.

गुळाचा उपाय


जर तुमचे कुटुंब आर्थिक समस्यांनी त्रस्त असेल, तर गणेश चतुर्थीच्या दिवशी सकाळी उठून आंघोळ करावी. यानंतर गुळामध्ये देशी तूप मिक्स करून गणेशाला अर्पण करावे. गुळापासून बनवलेला प्रसाद गाईला खाऊ घालावा. भगवान गणेश तुमच्या उपायाने प्रसन्न होतील आणि तुम्हाला इच्छित वरदान देतील.

शुद्ध पाण्याने अभिषेक करा

गणेशोत्सव देशभरात मोठ्या थाटामाटात साजरा करतात. या दिवशी गणपतीच्या मूर्तीला शुद्ध पाण्याने अभिषेक करावा. यासोबतच गणपती अथर्वशीर्षाचे पठण करावे. असे मानले जाते की असे केल्याने बाप्पा आपल्या भक्तांच्या सर्व अडचणी दूर करतात.

गरिबांना दान करा

गणेश चतुर्थीला तुम्ही अन्न, फळे आणि धान्य गरजूंना दान केले तर गणेश प्रसन्न होतात. असे मानले जाते की गरजूंना दान आणि मदत केल्याने गणेश प्रसन्न होतात आणि आपल्या भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करतात.

दुर्वा

गणेश चतुर्थीला बाप्पाला दुर्वा अर्पण करावे. या दिवशी शक्य असल्यास पिवळ्या रंगाची गणेशमूर्ती घरामध्ये स्थापित करावी. यादरम्यान श्री गणाधिपतये नमः या मंत्राचा जप करताना गणेशाच्या मूर्तीवर दुर्वा अर्पण करावे.

पिवळ्या रंगाची मिठाई

घरात तुमच्या मुलाच्या लग्नात अडचणी येत असतील तर गणेश चतुर्थीच्या दिवशी तुम्ही ही समस्या दूर करू शकता. गणेश चतुर्थीच्या दिवशी घरी मोदक बनवावे. त्यानंतर ते गणेशाला अर्पण करावे. असे मानले जाते की हा उपाय केल्याने मुलाचे लग्न होण्याची शक्यता वाढते.

मंत्राचा जप

तुमच्या कुटुंबातील सदस्यांना काही समस्यांना सामोरे जावे लागत असेल तर गणेशोत्सवा दरम्यान तुम्ही त्या कमी करू शकता. धार्मिक शास्त्रानुसार गणेश चतुर्थीला विधीपूर्वक आणि मनोभावे बाप्पाची पूजा करावी. तसेच 'ओम गं गण गणपतये नम:' या मंत्राचा 21 वेळा जप करावा. या मंत्राचा जप केल्याने बाप्पा प्रसन्न होतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Civil Service Transfers: गोवा नागरी सेवेत फेरबदल! गुरुदास देसाई यांची जिल्हाधिकारीपदी वर्णी तर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या

Mandre Panch Sexual Harassment Case: पंच रॉबर्ट फर्नांडिसविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी; महिलेचा छळ अन् मारहाण प्रकरणात

Mapusa ITI Fire Safety Course: 10वी पास तरुणांसाठी सरकारी रोजगाराची सुवर्णसंधी! म्हापसा 'ITI'मध्ये 24 जागांसाठी प्रवेश, एक वर्षाचा अभ्यासक्रम

Goa Crime Case: दोरीने गळा आवळला, पण मारेकरी कोण? गोव्यात गाजलेल्या 'अनमोड घाट' हत्येचा शेवट; चौघांची निर्दोष सुटका

PM Jan Dhan Yojana Goa: 2,35,200 नागरिकांपर्यंत पोहोचल्या बँकिंग सुविधा! जनधन योजनेत गोव्यातील 'कॅनरा बँक' अव्वल; केंद्रीय अर्थमंत्र्यांनी दिली आकडेवारी

SCROLL FOR NEXT