strawberry Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Fruit For Weight Loss: वजन कमी करण्यापासून शरीराच्या अनेक समस्या दूर करते 'हे' छोटे फळ

Fruit For Weight Loss: तर तुम्हाला कॅन्सर होण्याची शक्यता कमी होते.

दैनिक गोमन्तक

Fruit For Weight Loss: आपण स्वत:ला निरोगी ठेवण्यासाठी अनेक उपाययोजना करत असतो. त्यामध्ये चौरस आहार आणि योग्य व्यायामाचा समावेश होतो.

आपल्याला जर सुदृढ आणि निरोही राहायचे असेल तर आपल्या रोजच्या आयुष्यात ऋतुनुसार फळांचा समावेश करणे महत्वाचे असते. चला तर जाणून घेऊयात अशाच एका फळाचे आपल्या आरोग्यासाठी फायदे काय आहेत. हे फळ म्हणजे स्ट्रॉबेरी होय.

1. हृदयाच्या आरोग्यासाठी

स्ट्रॉबेरीच्या सेवनाने हृदयाचे आरोग्य सुधारते. यात पॉलिफेनॉल संयुगे मुबलक प्रमाणात असतात. हे संयुगे तुमचे हृदय निरोगी ठेवण्यासाठी प्रभावी ठरू शकतात. हृदयविकारापासून दूर राहण्यासाठी स्ट्रॉबेरी तुम्हाला मदत करते.

2. कॅन्सरला प्रतिबंध

स्ट्रॉबेरीमध्ये कॅन्सर प्रतिबंधक गुणधर्म असतात. त्यामुळे तुम्ही स्ट्रॉबेरीचे सेवन करत असाल तर तुम्हाला कॅन्सर होण्याची शक्यता कमी होते.

3. ब्लड प्रेशर नियंत्रण

यामध्ये पोटॅशियम मुबलक प्रमाणात असते, जे ब्लड प्रेशर नियंत्रित करण्यात मदत करते.

4. दातांचा पिवळेपणा दूर

स्ट्रॉबेरीमध्ये असलेले व्हिटॅमिन सी दातांचा पिवळेपणा दूर करते आणि त्यात एन्झाईम तयार होण्यास प्रतिबंध करते. त्यामुळे ज्यांचे दात पिवळे होण्यास सुरुवात होतात त्यांनी स्ट्रॉबेरी खायला पाहिजे.

5. वजन कमी

स्ट्रॉबेरीमध्ये फायबरसोबतच अनेक पोषकतत्त्वे असतात, त्यात पाणीही चांगले असते, जे वजन कमी करण्यास मदत करते.

'हे' पोषकघटक स्ट्रॉबेरीमध्ये आढळतात

स्ट्रॉबेरीमध्ये व्हिटॅमिन सी, अँटीऑक्सिडंट्स, अँटीइंफ्लेमेटरी, फोलेट, मॅग्नेशियम आणि पोटॅशियम यांसारख्या पोषक तत्वांचा भरपूर प्रमाणात समावेश असतो, जे शरीराच्या अनेक समस्या दूर करण्यात प्रभावी ठरतात. त्यामुळे तुमच्या फलाहारामध्ये स्ट्रॉबेरीचा समावेश करणे तुमच्या आरोग्यासाठी महत्वाचे असते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ireland Head Coach Resign: भारतविरुद्धच्या शानदार विजयानंतर आयर्लंडच्या मुख्य प्रशिक्षकांचा तडकाफडकी राजीनामा; गॅरी विल्सनकडे सोपवली जबाबदारी

Yuti Yog 2026: जुलै महिन्यात ग्रहांचा महाविनाशकारी खेळ! तीन वेळा बनणार 'अशुभ युती योग'; 5 राशींसाठी ठरणार काळ

'8th Pay Commission' ची प्रतीक्षा! सरकारी कर्मचाऱ्यांच्या 'त्या' 5 मागण्यांवर होणार शिक्कामोर्तब? जुलै महिन्यातील बैठकीकडे लक्ष

National Sub Junior Boxing Championship: गोव्याच्या कनिष्काला बॉक्सिंगमध्ये ब्राँझ, राष्ट्रीय सबज्युनियर स्पर्धेत मुलींच्या गटात चमकदार कामगिरी

First Marathi Woman in US Army: कोकणकन्येचा अटकेपार झेंडा! दापोलीच्या प्राजक्ता बोंगाळे अमेरिकी सैन्यात

SCROLL FOR NEXT