Frozen Food  Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Frozen Food खात असाल तर वेळीच व्हा सावध!

Frozen Food: पण त्यातून शरीराला पोषक तत्व मिळत नाहीत. त्यामुळे शरीरात पौष्टिकतेची कमतरता भासू शकते.

दैनिक गोमन्तक

Frozen Food: आजच्या बदलत्या जीवनशैलीत आपल्या राहण्या-खाण्याच्या सवयीदेखील बदलल्या आहेत. ताजी फळे किंवा ताजा भाजीपाला आपल्या आरोग्यासाठी उपयुक्त असल्याचे म्हटले जाते.

मात्र अनेकदा ताज्या भाजीपाल्याऐवजी फ्रोझन फूड खाण्याकडे लोकांचा कल वाढल्याचे दिसून येत आहे. लवकरात लवकर आणि हवे तेव्हा हे फ्रोझन केलेले अन्न उपलब्ध होत असले तरी त्याचा आपल्या आरोग्यावर वाईट परिणाम होत असल्याचे मत तज्ञांनी व्यक्त केले आहे.

पौष्टिकतेचा अभाव

फ्रोझन केलेल्या अन्नातील अनेक पोषक तत्वे नष्ट होतात. अशा स्थितीत तुम्ही जे अन्न खात आहात ते हेल्दी डाएट समजून तुमची भूक तर शमवते, पण त्यातून शरीराला पोषक तत्व मिळत नाहीत. त्यामुळे शरीरात पौष्टिकतेची कमतरता भासू शकते.

नैसर्गिक चव कमी

फ्रोझन फूड्सची चव ताज्या पदार्थांच्या तुलनेत किंचित वाईट असते हे तुमच्या अनेकदा लक्षात आले असेल. याचे कारण म्हणजे त्याचा ताजेपणा टिकवून ठेवण्यासाठी भरपूर प्रिझर्व्हेटिव्ह्जचा वापर केला जातो ज्यामुळे अन्नाची चव बर्‍याच प्रमाणात बदलू शकते.

पॅकेजिंग रसायनांमुळे होणारी हानी

प्लास्टिक किंवा इतर रसायने सामान्यतः गोठवलेल्या पदार्थांच्या पॅकेजिंगमध्ये वापरली जातात, ज्याचा वापर अन्नाचा ताजेपणा राखण्यासाठी केला जातो. या रसायनांमधून बाहेर पडणारे वायू आणि इतर रसायने आपल्या शारीरिक आरोग्यावर परिणाम करू शकतात. त्यामुळे कर्करोगासारख्या धोकादायक आजाराचा धोका वाढतो.

ब्लड प्रेशर वाढते

फ्रोझन फूड मुळे तुमच्या रक्तदाबावर परिणाम होतो. याबरोबरच त्याचा परिणाम धमन्यांवर देखील परिणाम होतो.

डोकेदुखी

तुम्हाला डोकेदुखीला सामोरे जावे लागू शकते. गळ्याला सूज येण्यासारखे प्रकारही अनेकांच्या बाबतीत घडतात. स्नायूवरदेखील वाईट परिणाम होतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT