Passive Smoking Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Passive Smoking Effects: किडनीपासून ते कानापर्यंत... 'या' आजारांना कारण ठरते पॅसिव्ह स्मोकिंग

धुम्रपान करणाऱ्यांच्या आजूबाजूला वावरणे आरोग्यासाठी घातक

Akshay Nirmale

Passive Smoking: ' धूम्रपान आरोग्यासाठी हानिकारक आहे'... ही वॉर्निंग खरेतर आता वाचून वाचून कंटाळवाणी झाली आहे. धूम्रपानामुळे आरोग्यावर वाईट परिणाम होतो. हृदयविकार, पक्षाघात, अगदी फुफ्फुसाचा कर्करोग होण्याचा धोका वाढतो, हे सगळे माहिती असतेच, पण तरीही सिगारेट ओढणाऱ्यांची संख्या काही कमी नाही.

दरम्यान, केवळ सिगारेट ओढणारेच नाही तर सिगारेट ओढणाऱ्यांच्या संपर्कात येणाऱ्या पॅसिव्ह स्मोकर्सनाही खूप धोका असतो. किडनीपासून ते कानापर्यंतचे विविध आजार पॅसिव्ह स्मोकिंगमुळे उद्भवू शकतात. त्यामुळे यापुढे कुणी धुम्रपान करत असेल तर त्याच्या सान्निध्यात जायच्या आधी विचार करा.

डब्ल्यूएचओच्या अहवालानुसार, धूम्रपानामुळे दररोज सुमारे 14 हजार लोक आपला जीव गमावतात. सिगारेट ओढणाऱ्यांच्या आजूबाजूला उभे राहणाऱ्यांनाही सिगारेटचा त्रास होतो. याला पॅसिव्ह स्मोकिंग म्हणतात. हे खूप हानिकारक आहे आणि हळूहळू सिगारेटचा धूर तुमचे आरोग्य नष्ट करू शकतो.

सिगारेट, बिडी किंवा सिगारमधून निघणारा धूर हा विषारी असतो. एकप्रकारे याला धुराचे अवशेष असेही म्हणता येईल. हे तुमचे केस, त्वचा, कपडे, सामान, खोली, कार, कार्पेट आणि अगदी लहान मुलांच्या खेळण्यांना चिकटून राहते.

जेव्हा सिगारेटचा धूर निघतो तेव्हा तो विषारी घटकांच्या संपर्कात येतो आणि रासायनिक प्रतिक्रिया देतो. यानंतर ते आणखी धोकादायक बनते. आता तुम्ही धुम्रपान केले नसले तरीही तुम्ही सिगारेटच्या धुराच्या संपर्कात येऊ शकता. याला पॅसिव्ह स्मोकिंग म्हणतात. ही अशी रसायने आहेत, ज्याचा आपल्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो.

गर्भवती महिलांनी सावधगिरी बाळगणे गरजेचे

Passive smoking चा गर्भवती महिलांवर सर्वात जास्त परिणाम होतो. यामुळे गर्भात वाढणाऱ्या बाळालाही हानी पोहोचते. एका संशोधनात असे सांगण्यात आले आहे की, पॅसिव्ह स्मोकिंगमुळे न जन्मलेल्या मुलाच्या फुफ्फुसांच्या विकासात समस्या निर्माण होतात. जेव्हा मूल जन्माला येते तेव्हा त्याला श्वसनाचे आजार असू शकतात.

रोगप्रतिकारक शक्ती नष्ट होते

पॅसिव्ह स्मोकिंगमुळे लहान मुलांची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होते. यामुळे दमा, कानात संसर्ग, पुन्हा पुन्हा आजारी पडणे, निमोनिया यांसारख्या समस्या उद्भवू शकतात. एवढेच नाही तर पॅसिव्ह स्मोकिंगमुळे स्वादुपिंड, किडनीचे आजार, तोंडाचे आजार अशा समस्या उद्भवू शकतात. घशातील समस्या देखील असू शकतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT