Friendship Day 2023 Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Friendship Day: बेस्ट फ्रेंडसोबत भांडलाय? अशी करा संवादाची सुरूवात

बेस्ट फ्रेंडसह झाल्यास नेमक काय करावे हा जाणून घेऊया.

Puja Bonkile

Friendship Day: ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवारी म्हणजेच ६ ऑगस्टला म्हणजेच आज सर्वत्र फ्रेंडशिप डे साजरा केला जात आहे. आज तुमच्या मित्रामध्ये काही वाद झाले असेल तर काही ट्रिक्स वापरून संवाद साधू शकता. अनेक वेळा रागाच्या भरात रागावणे , बोलणे सोपे आहे. अशा वेळी कसा संवाद साधावा हे समजत नसेल तर तुम्ही पुढिल चिप्स वापरू शकता.

जेव्हा आपला वाद होत असतो, तेव्हा बोलण्यावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे.कारण काही गोष्टी नियंत्रणाबाहेर जाण्याची शक्यता असते.

तुम्ही मित्राला आजच्या दिवशी एक खास गिफ्ट देऊन संवाध साधु शकता. यामुळे तुमची मैत्री पुन्हा बहरू लागेल.

जेव्हा आपण काही गोष्टी समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो तेव्हा आवाज आणि देहबोलीवर देखील लक्ष ठेवले पाहिजे.

मैत्रीमध्ये भूतकाळात जाऊन त्यावेळच्या जखमा आणि चुका समोर आणण्याचा प्रयत्न करून नये.हे प्रत्येक नात्यासाठी फायदेसीर असते.

समोरच्या व्यक्तीच्या बोलती बंद करून अनादर करण्यापेक्षा आपण त्याचे एकले पाहिजे आणि संवाद साधण्याची योग्य जागा दिली पाहिजे.

आपण आपल्या तक्रारीचा भाग सांगण्याचा प्रयत्न करत असतांना, आपण किती अतिशयोक्ती केली पाहिजे हे लक्षात घेतले पाहिजे. कारण त्याचा समोरच्या व्यक्तीवर बराच परिणाम होऊ शकतो.

काय गिफ्ट द्यावे

  • हँडक्राफ्टेड आयटम

तुम्ही दूर राहत असलेल्या मित्राला लाकडी किंवा एकादी युनिक हँडक्राफ्टेड वस्तु गिफ्ट म्हणून देऊ शकता. यामुळे दोघांमधील बाँडिंग वाढेल.

  • नेटफ्लिक्स सब्सक्रिप्शन

तुम्ही तुमच्या खास फ्रेंडला (Friend) नेटफ्लिक्स सब्सक्रिप्शन देवून त्याच्या सोबत चित्रपट पाहू शकता. यामुळे एकत्र पाहण्याचा आनंद घेण्याचा उत्तम मार्ग असू शकतो.

  • फिटनेस गिफ्ट

या खास दिवशी तुम्ही तुमच्या खास मित्राला (Friend) फिटनेससंबंधित गिफ्ट देवू शकता. यात तुम्ही डंबल, पाण्याची बाटली किंवा योगा मॅट सुद्धा गिफ्ट देवू शकता. हा सध्याचा नवा ट्रेंड आहे.

  • शॉपिंग गिफ्ट कार्ड

आपल्या आयुष्यात असे काही खास मित्र (Friend) असतात की त्यांना काय गिफ्ट द्यावे हे सुचत नाही. यावेळी तुम्ही शॉपिंग गिफ्ट कार्ड भेट म्हणून देवू शकता.

  • स्किन केअर प्रोडक्ट देऊ शकता

या फ्रेंडशिप डे ला तुम्ही स्किन केअर प्रोडक्ट, किंवा सेल्फ केअर वस्तु भेट म्हणून देऊ शकता.तुम्हाला हवे असल्यास तुम्ही स्पा किंवा मसाजसाठी गिफ्ट व्हाउचर देखील देऊ शकता.

  • फुड पार्टी करू शकता

तुमच्या मित्राला जर खाण्यापिण्याची आवड असेल तर तुम्ही फ्रेंडशीप डेला एकत्र पार्टी करू शकत नसाल तर हा पर्याय वापरू शकता. टेस्टी पदार्थ, ड्रिंक्स, स्नॅक्स गिफ्ट करू शकता.

  • कॉफी मग किंवा टी-शर्ट

तुम्ही मैत्रीवर लिहिलेली एखादी खास कविता, स्लोगन, कोट किंवा काहीतरी फ्रेंडला खास वाटेल असे करू शकता. तुम्ही उशी, टी-शर्ट, बेडशीट किंवा कॉफी मग यावर मॅसेज किंवा तुमचा फोटो प्रिंट करून पाठवू शकता. ही भेट नक्कीच आवडेल

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

Viral Post: 'मला नवरा हवाय, पण माझ्या अटींवर...' तरूणीने 'Google Form'वरून घेतली मुलांची परीक्षा! 240 हून अधिक पोरांनी दाखवला इंटरेस्ट, प्रश्न वाचून व्हाल थक्क

SCROLL FOR NEXT