Food Poisoning  Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Food Poisoning वर 'हे' पदार्थ गुणकारी

उन्हाळ्यात अनेक लोकांना अन्नातून विषबाधा होत असते.

दैनिक गोमन्तक

उन्हाळ्यात अनेक लोकांना पोटासंबंधीत आजार उद्भवतात. कारण अनेक लोक खाण्यापिण्याकडे दुर्लक्ष करतात. उन्हाळ्यात (Summer) अन्न लवकर खराब होते. जर तुम्ही उन्हाळ्यात लवकर खराब होणाऱ्या पदार्थांचे सेवन केले तर त्या अन्नातून विषबाधा होऊ शकते. त्यामुळे उलट्या, मळमळ, पोटदुखी, जुलाब यासारख्या समस्या निर्माण होतात. यामुळे उन्हाळ्यात खाण्या-पिण्याच्या गोष्टींबाबत काळजी घेणे गरजेचे आहे.

आल:

अन्नातून विषबाधा झाली असल्यास घरगुती उपाय म्हणून आल्याचा वापर करू शकता. एक चमचा किसलेले आल, एक कप पाण्यात उकळावे. त्यात चवीनुसार मध किंवा साखर घालावे.. अन्नातून विषबाधा झाल्यास तुम्ही दिवसातून दोनदा याचे सेवन करू शकता. यामुळे तुमचा त्रास कमी होऊ शकतो.

दही आणि मेथी:

अन्नातून झालेली विषबाधा दूर करण्यासाठी दही आणि मेथी हे अतिशय प्रभावी उपाय मानले जातात. यासाठी एक चमचा दही आणि मेथीचे दाण्याचे सेवन करावे.

लिंबू:

अन्नातून झालेली विषबाधा दूर करण्यासाठी लिंबू एक उत्तम उपाय मानला जातो. यासाठी एक चमचा लिंबाच्या रसात साखर मिक्स करून सेवन करावे. आपण त्यात थोडे पाणी देखील घालू शकता.

* केळी

अन्नातून झालेली विषबाधा दूर करण्यासाठी केळी हा एक चांगला उपाय आहे. केळीचे सेवन केल्याने पचन संस्था देखील सुरळीत कार्य करते. अन्न विषबाधा टाळण्यासाठी दररोज किमान एका केळीचे सेवन करावे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Diwali Bonus for Central Govt Employees: केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिवाळीची मोठी भेट! मोदी सरकारकडून बोनस जाहीर; खात्यात येणार 'इतके' पैसे

Crime News: आधी प्रेमसंबंध, नंतर हत्येचा कट! पत्नीने पतीच्या मदतीने प्रियकराचा गळा आवळला; मृतदेह गोणीत भरून कालव्यात फेकला

Triple Talaq Case: लग्नानंतर 21 वर्षे संसार, 3 मुलं आणि आता...! बायकोला ट्रिपल तलाक देणाऱ्या नवऱ्याला कोर्टाचा दणका; सुनावली 'इतक्या' वर्षांची शिक्षा अन् दंड

VIDEO: 'सर्वात मोठे ओठ' बनवण्याचा अट्टहास! डॉक्टरांनी नकार दिल्यावर महिलेने घरीच घेतलं इंजेक्शन; पुढे नको तेच झालं, पाहा व्हिडिओ

Bulbul Film Festival: बुलबुल बालचित्रपट महोत्सवाची सांगता; 'द ग्रेट ग्रॅंड सुपर हिरो'चे प्रदर्शन, सर्वोत्तम चित्रपटाची घोषणा

SCROLL FOR NEXT