Holi Safety Tips Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Holi Safety Tips: रंगांची उधळण करतांना, मुलांची अशी घ्यावी काळजी

होळी खेळतांना लहान मुलांच्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे.

दैनिक गोमन्तक

रंगांचा उत्सव म्हणजे होळी (Holi) 18 मार्च ला साजरा केला जाणार आहे. विशेषत: लहान मुलांचा हा आवडता सण आहे. लहान मुलांची होळीसाठी तयारीला लागले आहेत. पण एक छोटीशी चूक त्यांना अडचणीत आणू शकते. विशेषत: लहान मुलांच्या आरोग्याची (Health) काळजी घेणे गरजेचे आहे.

* मुलांवर लक्ष ठेवणे

होळी खेळताना लहान मुलांवर लक्ष ठेवणे गरजेचे आहे. जेव्हा लहान मुले पाण्यात खेळतात तेव्हा काळजी घेणे आवश्यक आहे.

* हर्बल रंगांचा वापर

लहान मुलांची त्वचा (Skin) अतिशय नाजुक असते. त्यामुळे रासायनिक रंगांचा वापर न करता हर्बल रंगांचा वापर करावा. यामुळे लहान मुलांचे आरोग्य धोक्यात येणार नाही.

* पाण्याचे फुगे टाळावे

होळी खेळताना पाण्याचे फुगे खेळणे टाळावे. कारण फुगे हातातून निसटण्याची दुखापत होऊ शकते. यामध्ये कान, डोळे किंवा नाकात पाणी जावू शकते.

* योग्य कपडे वापरावे

होळी खेळताना लहान मुलांना योग्य कपडे परिधान करून द्यावे. याची काळजी पालकांनी घ्यावी. लहान मुलांना फूल बाह्यांचे कपडे परिधान करून दिल्याने रंगाचा थेट त्वचेशी संबंध येत नाही.

* त्वचेची काळजी

रंग खेळण्यापूर्वी लहान मुलांना त्वचेवर खोबरेल तेल लावून द्यावे. तसेच केसांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी चांगले तेल लावावे. यामुळे लहान मुलांचे आरोग्य चांगले राहील. अशी काळजी घेतल्यास लहान मुलांना होळीचा आनंद घेता येईल आणि पालकांना देखील मुलांची चिंता राहणार नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT