Feng shui Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Feng Shui: फेंगशुईचे 'हे' 3 उपाय करतील धनाची कमतरती दूर

Feng shui Tips: फेंगशुईचे बहुतेक नियम पाणी आणि हवेवर आधारित आहेत.

दैनिक गोमन्तक

वास्तू आणि ज्योतिष शास्त्राप्रमाणेच फेंगशुई शास्त्रामध्ये असे अनेक उपाय सांगण्यात आले आहेत, जे आपल्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर आहेत. चिनी संस्कृतीशी संबंधित असलेली फेंगशुई वास्तू भारतातही मोठ्या संख्येने फॉलो करत आहे. त्याचे नियम अंगीकारून आणि उपाय करून जीवनात सुख-समृद्धी सहज आणता येते. ज्याप्रमाणे भारतातील जीवनातील बहुतेक अडथळे दूर करण्यासाठी वास्तुशास्त्र उपयुक्त आहे , त्याचप्रमाणे चीनची फेंगशुई (Feng Shui) देखील नकारात्मकता दूर करण्यासाठी प्रभावी मानली जाते. फेंगशुईमध्ये फेंग म्हणजे हवा आणि शुईचा संबंध पाण्याशी आहे. (follow these best feng shui tips for wealth money other benefits)

फेंगशुईचे बहुतेक नियम पाणी आणि हवेवर आधारित आहेत. पाहिले तर लोक आता फेंगशुईमध्ये सांगितलेल्या गोष्टी घरात ठेवल्याने शुभफळ वाढवतात. आम्ही तुम्हाला अशाच काही फेंगशुई टिप्सबद्दल सांगणार आहोत, ज्याचा अवलंब करून तुम्ही आनंदी जीवन जगू शकता. जाणून घ्या या टिप्स.

* विंड चाइम (Wind Chime)

फेंगशुई वास्तुनुसार घराच्या मुख्य गेट किंवा खिडक्यांवर विंड चाइम लावल्याने घरात सकारात्मकता कायम राहते. त्याचा आवाज मनात सकारात्मकता आणतो. तसेच आपल्याला वाईट गोष्टींपासून दूर ठेवतो. विंड चाइमने व्यवसाय आणि नोकरीतही प्रगती साधता येते, असे म्हणतात. धनलाभासाठी आज घरात विंड चाइम लावा.

Wind Chime

बांबू वनस्पती

फेंगशुईमध्ये बांबूची वनस्पती खूप शुभ मानली जाते. बांबूचे पवित्र रोप घरात ठेवल्याने धनाची कमतरता दुर होते. असे म्हटले जाते की हे रोप लावल्याने पैसे कमावण्याचे नवीन मार्ग तर खुले होतीलच, पण तुमचे रखडलेले पैसेही परत मिळू शकतात. याशिवाय घरामध्ये असलेली नकारात्मक ऊर्जा देखील दूर करू शकते.

bamboo tree

लाफिंग बुद्ध

आनंद, शांती आणि संपत्तीचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या लाफिंग बुद्धाला फेंगशुई शास्त्रात विशेष महत्त्व देण्यात आले आहे. असे म्हटले जाते की हे घरामध्ये ठेनल्याने शुभफळ प्राप्त होते. मुलाच्या स्टडी रूममध्ये लाफिंग बुद्धा ठेवल्यास त्यांना अभ्यासात लक्ष केंद्रित करण्यासही मदत होऊ शकते.

laughing buddha

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Dance Viral Video: माझ्या डोईवरी भरली घागर रे... कोकणातल्या पोरांचा डान्स पाहून तुम्हीही म्हणाल, 'एक नंबर...'

Vice President Candidate: ठरलं! एनडीए’चे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून सी.पी. राधाकृष्णन यांच्या नावाची घोषणा

America Firing: गोळीबाराने हादरले 'न्यूयॉर्क'! नाइट क्लबमध्ये बेछूट गोळीबार, 3 ठार, 8 जखमी

Goa Film Festival 2025: ज्येष्ठ अभिनेत्री वर्षा उसगावकर जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित, ‘जुझे’ ठरला सर्वाधिक पुरस्कार विजेता चित्रपट

'...नाहीतर देशाची माफी मागा’, राहुल गांधींच्या आरोपांवर मुख्य निवडणूक आयुक्तांचे थेट प्रत्युत्तर; दिली 7 दिवसांची मुदत

SCROLL FOR NEXT