Benefits of Being Single Woman Dainik Gomantak
लाइफस्टाइल

मुलींना का करायचे नाही लग्न? रिपोर्टमधून मोठा खुलासा

Manish Jadhav

Benefits of Being Single Woman: लग्नाबाबत तरुणांचे विचार बदलत आहेत. आता ते एकटे राहणे पसंत करत आहेत. त्यांना वाटते की, लग्न त्यांच्या करिअरमध्ये अडथळा बनू नये, ज्यामुळे ते उशिरा लग्न करतात किंवा लग्नच करत नाहीत. विशेषत: मुलींचा असा विश्वास आहे की, त्यांना त्यांची स्वप्ने साकार करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे Sacrifice करायचे नाहीये. आता मुलींना लग्न का करायचे नाही या प्रश्नावर सर्वेक्षण करण्यात आले आहे. त्यांना अविवाहित राहण्यात आनंद आहे का?

दरम्यान, नुकतेच एक सर्वेक्षण करण्यात आले, ज्यामध्ये एक अतिशय धक्कादायक बाब समोर आली आहे. हा अभ्यास डेटा विश्लेषक ‘मिंटेल’ने केला आहे. या सर्वेक्षणात असा दावा करण्यात आला आहे की, 49% पुरुष अविवाहित असूनही आनंदी आहेत. तर 61% मुलींना एकटे राहायचे आहे. या सर्वेक्षणातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे असा दावा करण्यात आला आहे की, 75% अविवाहित मुलींनी जोडीदाराचा शोधही घेतला नाही. मात्र, यात मुलेही मागे नाहीत. मुलींच्या तुलनेत 65% मुले असे आहेत ज्यांनी लग्न करण्याचा विचारही केला नाही.

कोणत्या कारणास्तव तरुणांना लग्न करायचे नाही?

लग्नासारखे पवित्र नाते जपण्याची जबाबदारी मुलांपेक्षा मुलींवर अधिक असल्याचे अभ्यासात म्हटले आहे. नातेसंबंध जपण्याबरोबरच त्यांना घरातील कामेही करावी लागतात जसे की, स्वयंपाक करणे, कुटुंबाची काळजी घेणे, मुलांवर चांगले संस्कार करणे इत्यादी. लग्नानंतर त्यांना स्वतःसाठी वेळ मिळत नाही. याशिवाय, जर त्यांना आयुष्यात काही मिळवायचे असेल तर त्यांना कामासह घर सांभाळणे कठीण होऊन बसते. त्यामुळे ते लग्नात रस कमी दाखवत आहेत.

दुसरीकडे, पुरुषप्रधान देशात मुलींची घुसमट होत असल्याचा दावा या अहवालात करण्यात आला आहे. त्या त्यांच्या करिअरवर अधिक लक्ष केंद्रित करत असून त्यांच्या इच्छेनुसार आयुष्य जगत आहेत. लोक काय म्हणतील? याबाबतची चिंता बाजूला ठेवून मुली सुशिक्षित आणि स्वावलंबी होत आहेत. त्यामुळे आता अविवाहित मुलींची संख्या पूर्वीपेक्षा झपाट्याने वाढत आहे. लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे मुलींना एकटे राहण्यात कोणतीही अडचण येत नाही. मुलींचा असा विश्वास आहे की, पत्नी आणि आई बनल्याने त्यांना आनंद मिळेल याची शाश्वती नसते. एकटे राहून त्यांना आनंद मिळत असेल तर त्यात गैर काय? त्या स्वावलंबी आहेत. अशा परिस्थितीत त्यांना जोडीदाराची गरज भासत नाही.

लिव्ह इन रिलेशनशिपमुळे मुलींची विचारसरणी बदलली आहे का?

अहवालात म्हटले आहे की, 'काही मुली लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये इतक्या आनंदी असतात की त्यांना लग्न करण्याची गरज वाटत नाही. त्यांना कोणत्याही प्रकारच्या जबाबदारी नको आहे. त्यामुळेच त्या लग्न करणे पसंत करत नाहीत.'' सर्वेक्षणात असेही समोर आले आहे की, देशातील 83 टक्के मुलींनी हे मान्य केले आहे की, जर त्यांनी लग्न केले नसते तर त्या त्यांच्या आयुष्यात खूप आनंदी राहिल्या असत्या. त्यांना कोणत्याही बंधनात अडकलेले आवडत नाहीत. तर 83 टक्के मुली मानतात की, त्यांना लग्नाची घाई नाही. जोपर्यंत त्यांना योग्य जीवनसाथी मिळत नाही तोपर्यंत त्या योग्य जोडीदाराची वाट पाहतात.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Fact Check: गोव्यात बोट पलटी होऊन 23 लोकांचा मृत्यू, 64 बेपत्ता; व्हायरल व्हिडिओ मागील सत्य काय?

Tourist in Goa: गोव्यात धार्मिक तणाव, पर्यटकांची पायपीट तर शाळकरी मुलांचे हाल!!

गोव्यातील पोर्तुगीजकालीन पूलांचे होणार 'स्ट्रक्चरल ऑडिट'; सावंत सरकारचा निर्णय

Goa Government Schools: ...गेल्या 5 वर्षांत ट्रेंड बदलला, शासनाचे सरकारी शाळांना प्राधान्य; CM सावंत

Goa Today's News Live: गोव्यातील सर्व धर्मियांमध्ये संत फ्रान्सिस झेवियर यांचा DNA; मंत्री सिक्वेरा

SCROLL FOR NEXT