Facial Cleanup At Home Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Facial Cleanup At Home: घरीच चेहरा क्लीन करण्यासाठी 'हा' सोपा उपाय ठरेल महत्वाचा

Facial Cleanup At Home: नैसर्गिकरित्या बॅक्टेरिया शोषून घेते आणि चेहऱ्यावरील छिद्र बंद करताना घाण जमा होण्यापासून रोखते, त्यामुळे पिंपल्सची समस्या दूर होते.

दैनिक गोमन्तक

Facial Cleanup At Home: आपला चेहरा सुंदर दिसावा असे प्रत्येकालाच वाटत असते. त्यासाठी आपण विविध उपाययोजना देखील करत असतो. चेहऱ्यावर मुरुम येणे, काळे डाग पडणे अशा अनेक समस्यांचा सामना आपल्यापैकी अनेकजण करत असतात.

त्यासाठी आपण अनेकदा आपल्या घरात असे काही फेसपॅक तयार करु शकतो की ज्यामुळे आपल्या या समस्या कमी होऊ शकतात. तसेच जर आपण व्यवस्थित चेहरा स्वच्छ साफ करत नसेल तरीदेखील तुम्हाला अशा समस्यांचा सामना करावा लागतो.

जर तुम्हाला तुमचा चेहरा व्यवस्थित स्वच्छ करायचा असेल तर प्रथम 4 कप पाणी घ्या आणि सुमारे 20 मिनिटे उकळा. हे पाणी हवाबंद भांड्यात ठेवा आणि त्यात २ चमचे नॉन आयोडीनयुक्त मीठ टाका. मीठ पूर्णपणे विरघळल्यावर, मिश्रण थंड होण्यासाठी काही वेळ सोडा. शेवटी या पाण्याने चेहरा धुवा.

मिठाच्या पाण्याने चेहरा धुण्याचे 4 फायदे

1. पिंपल्स निघून जातील

मिठाचे पाणी नैसर्गिकरित्या बॅक्टेरिया शोषून घेते आणि चेहऱ्यावरील छिद्र बंद करताना घाण जमा होण्यापासून रोखते, त्यामुळे पिंपल्सची समस्या दूर होते.

2. कोरड्या त्वचेपासून मुक्त व्हा

मिठाच्या पाण्याने चेहरा धुतल्यास सोरायसिस आणि कोरडेपणा दूर होतो. याचे कारण म्हणजे मिठात कॅल्शियम, पोटॅशियम आणि मॅग्नेशियमचे प्रमाण खूप जास्त असते.

3. चेहऱ्यावरील काळे डाग कमी होतील

मिठाच्या पाण्याने चेहरा धुतल्याने चेहऱ्यावरील डाग हळूहळू निघून जातात. हे एक उत्कृष्ट एक्सफोलिएंट आहे, ते मृत त्वचेच्या पेशी काढून टाकते आणि नवीन त्वचेच्या पेशी तयार होऊ लागतात.

4. चेहरा तरुण दिसतो

मीठ पाणी एक प्रकारचे नैसर्गिक डिटॉक्सिफायर आहे. हे त्वचेतून हानिकारक विषारी पदार्थ आणि बॅक्टेरिया काढून टाकण्यास मदत करते आणि त्वचा दीर्घकाळ निरोगी ठेवण्यास मदत करते.

मात्र चेहऱ्यासाठी कोणताही प्रोडक्ट वापरताना किंवा चेहऱ्यावर काहीही लावताना तुम्ही तुमच्या डॉक्टरांचा सल्ला जरुर घेतला पाहिजे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

Viral Post: 'मला नवरा हवाय, पण माझ्या अटींवर...' तरूणीने 'Google Form'वरून घेतली मुलांची परीक्षा! 240 हून अधिक पोरांनी दाखवला इंटरेस्ट, प्रश्न वाचून व्हाल थक्क

SCROLL FOR NEXT