Eyes Colour: व्यक्तीच्या शरीरातील सर्वात महत्वपूर्ण आणि नाजुक अवयव म्हणजे डोळा. या अवयवामुळे माणसाला जग बघता येते. व्यक्तीच्या सौंदर्यात भर घालणाऱ्या डोळ्यांचे मानसिक आरोग्यासंदर्भात मोठे महत्व आहे. डोळ्यांची पण एक भाषा असते, असं प्रेमात असणारी लोकं जे म्हणतात. त्यामागे काही शास्त्रीय कारणे पण आहेत. आपल्या डोळ्यांच्या रंगावरुन आपले व्यक्तीमत्व कसे असेल? याबाबत काही गोष्टी सांगता येतात. त्याबद्दल जाणून घेऊयात.
घारे डोळे
घारे डोळे असलेल्या व्यक्ती अनेकदा आपल्याला आसपास पहायला मिळतात. घारे डोळे असणाऱ्या व्यक्ती अतिशय सकारात्मक असतात. त्यांना आपल्या आयुष्यात आव्हानं पसंद असतात. पण रोजच रुटीन फॉलो करायचा त्यांना कंटाळा असतो. त्याऐवजी मजा-मस्ती करणं अशा व्यक्तींना आवडते. घारे डोळे (Eyes) असणाऱ्या व्यक्ती खूप बोल्ड आणि डेरींगबाज असतात. या व्यक्ती मात्र आपली सिक्रेटस् इतरांपासून लपवून ठेवतात.
निळ्या रंगाचे डोळे
निळ्या रंगाचे डोळे असणाऱ्या व्यक्ती खूप हुशार असतात. या व्यक्ती लोकांना घमंडी वाटतात पण त्यांचा स्वभाव तसा नसतो. सर्व नवीन गोष्टींसाठी या व्यक्ती प्रयत्न करत असल्यामुळे लोकांना ते खटकतात.
गर्द काळ्या रंगाचे डोळे
डार्क काळ्या डोळ्यांची व्यक्ती रहस्यमयी स्वभावाच्या (Nature) असते. प्रामाणिक आणि विश्वासू असते. व्यावहारिक दृष्टीकोन बळगते. तसेच आपल्या मेहनतीवर त्यांना पूर्ण विश्वास असतो.
राखाडी रंगाचे डोळे
या रंगाचे डोळे असणारे व्यक्ती बाहेरुन कठोर पण मनाने फार हळवे असतात. ते आपल्या पर्सनल आणि प्रोफेशनल आयुष्याबाबतीत गंभीर असतात.
हिरव्या रंगाचे डोळे
या व्यक्ती बुद्धीमान, उत्साही आणि खूप सुंदर असतात. नविन गोष्टींचा शोध घ्यायला यांना आवडते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.