Hot Water Bath Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Hot Water Bath: गरम पाण्याने अंघोळ करण्याचे फायदे तर माहित असतीलच, मग तोटेही घ्या जाणून

अत्यंत गरम पाणी आपल्या त्वचेसाठी ते केसांसाठी खूप हानिकारक आहे.

दैनिक गोमन्तक

आजपर्यंत तुम्ही गरम पाण्याने अंघोळ करण्याचे अनेक फायदे ऐकले असतील. पण त्यामुळे होणारे नुकसान तुम्हाला माहिती आहे का? अत्यंत गरम पाणी आपल्या त्वचेसाठी ते केसांसाठी खूप हानिकारक आहे.

याशिवाय खूप गरम पाण्याने अंघोळ केल्याने तुम्ही उच्च रक्तदाबासारख्या गंभीर समस्यांनाही बळी पडू शकता. जास्त गरम पाण्याने तुमच्या शरीराला काय नुकसान होते ते जाणून घेऊया…

त्वचेसाठी हानिकारक

तुम्ही खूप गरम पाण्याने अंघोळ करत असाल तर काळजी घ्या. खूप गरम पाण्याने आंघोळ केल्यामुळे तुमची त्वचा खूप कोरडी होते, ज्यामुळे खाज आणि त्वचेसंबंधी इतर आजार होऊ शकतात. जर तुम्हाला गरम पाणी वापरायचे असेल तर तुमच्या शरीरावर मॉइश्चरायझर जरूर वापरा. तसेच त्वचेची योग्य काळजी घ्या.

केस गळणे

खूप गरम पाण्याने अंघोळ केल्याने केस खूप कोरडे होतात. ज्यामुळे तुम्हाला कोरडे स्कॅल्प आणि केस गळण्याच्या समस्येला सामोरे जावे लागू शकते. हे टाळण्यासाठी, कोरडे केस शॅम्पू करू नका आणि अंघोळ करण्यापूर्वी केसांना थोडे तेल लावा.

रक्तदाब

खूप गरम पाण्याने अंघोळ केल्याने तुमचा रक्तदाब वाढू शकतो. जर तुम्हाला हायपरटेन्शन (उच्च रक्तदाबाची समस्या) असेल तर तुम्ही खूप गरम पाण्याने अंघोळ करू नये याची काळजी घ्यावी.

पाठदुखी

खूप गरम पाण्याने अंघोळ केल्याने तुम्ही पाठदुखीच्या समस्येला बळी पडू शकता. खूप गरम पाण्याने आंघोळ केल्याने तुमचे स्नायू घट्ट होतात. ज्यामुळे तुम्हाला पाठदुखीसारख्या समस्या होऊ शकतात.

डिहायड्रेशन

खूप गरम पाण्याने अंघोळ केल्याने तुम्ही डिहायड्रेशनचे शिकार होऊ शकता. यामुळे जास्त घाम येणे आणि निर्जलीकरण होऊ शकते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

T20 World Record: 22 षटकार, 17 चौकार… टी20 क्रिकेटमध्ये ठोकलं 'द्विशतक', 140 किलो वजनाच्या खेळाडूनं घातला धुमाकूळ; गोलंदाजांच्या उडवल्या चिंधड्या

Strait of Hormuz: इराणचा अमेरिकेला 'डिजिटल' दणका! होर्मुजच्या सामुद्रधुनीतील इंटरनेट केबल्सवर नियंत्रण मिळवण्याची तयारी; जागतिक दळणवळण धोक्यात

Shani Gochar 2026: शनीदेवाचा रेवती नक्षत्रात धमाका! 2 जुलैपासून 'या' 3 राशींना लागणार लॉटरी; उत्पन्नात होणार मोठी वाढ

पेडण्यात सिंधुदुर्गची ताजी मासळी, रखडलेल्या प्रकल्पामुळे सुविधांचा अभाव; ग्राहकांचा नाईलाज

Goa Assembly Election 2027: गोव्यात आगामी सरकार काँग्रेसचेच! अमित पाटकरांनी व्यक्त केला विश्वास; केरळ, तमिळनाडू विजयाबद्दल काँग्रेसकडून जल्लोष

SCROLL FOR NEXT