Evening Snacks: चहासोबत 'या' 5 प्रकारच्या व्हेज कटलेटचा घ्यावा आस्वाद  Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Evening Snacks: चहासोबत 'या' 5 प्रकारच्या व्हेज कटलेटचा घ्यावा आस्वाद

हिवाळ्यात (Winter) मिळणाऱ्या भाज्यांपासून तुम्ही स्वादिष्ट व्हेज कटलेटचा (veg cutlets) आनंद चहा सोबत घेवू शकता.

दैनिक गोमन्तक

संध्याकाळचा चहा (Tea) किंवा कॉफी (Coffee) सोबत खायला हलका नाश्ता मिळाला तर मज्जाच वेगळी असते. चहा-कॉफीसोबत समोसा आणि कचोरी खाऊन तुम्हाला जर कंटाळा आला असेल तर या हिवाळ्यात (winter) व्हेज कटलेट नक्की ट्राय करून पहा. चला तर मग जाणून घेऊया कटलेटचे (Veg Cutlets) विविध आणि स्वादिष्ट (Tasty) प्रकार कोणते आहेत.

* रव्याचे कटलेट्स

संध्याकाळी चहा (Tea) किंवा कॉफीसोबत (Coffee) तुम्ही रव्याचा कटलेटचा (Cutlets) आनंद घेवू शकता. हा कटलेटचा प्रकार तयार करणे अगदी सोपे आहे. त्यात तुम्ही हिवाळ्यात मिळणाऱ्या भाज्यांचा समावेश करू शकता. यामुळे आरोग्य (Health) देखील चांगले राहते. गरमागरम चहासोबत तुम्ही रव्याच्या कटलेटचा (Cutlets) आस्वाद घेवू शकता.

* राइस कटलेट

राइस कटलेट (Rice Cutlets) अलीकडे कुप टेंडमध्ये आहे आणि स्वादिष्ट पदार्थ म्हणून पसंत केल्या जात आहे. उरलेला भात (Rice) आणि भाज्या घालून बनवलेला हा पदार्थ तुम्ही संध्याकाळी चहा (Tea) सोबत खावू शकता. यासोबत तुम्ही हिरवी चटणी किंवा मेओ सॉससोबत सर्व्ह करू शकता.

* ब्रेड कटलेट

ब्रेड कटलेट (Bread cutlets) हा सर्वांचा आवडता पदार्थ आहे. ब्रेड कटलेट (Bread cutlets) बनवणे अगदी सोपे आहे. यासाठी तुम्ही उकडलेले बटाटे, उकडलेले मटार आणि काही भाज्या वापरू शकता. त्याचे कटलेट (Cutlets) बनवून तुम्ही ते तेलात बेक करू शकता. तुम्ही ब्रेड कटलेट चटणी किंवा सॉससोबत सर्व्ह करू शकता.

* आलू मलाई कटलेट

संध्याकाळी चहासोबत आलु मलाई कटलेटचा (Potato Cream Cutlet) आस्वाद घेवू शकता. हा कटलेटचा (Cutlet)झटपट बनवला जाणारा उत्तम प्रकार आहे. तुमच्या घरी कोणी पाहुणे येत असेल तर हा पदार्थ नक्की सर्व्ह करावा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Waste Management: कचरा व्यवस्थापनाचे नियम पाळा, अन्यथा कारवाईची शक्यता; 385 घटकांवर प्रशासनाची नजर

Morjim School Repair News: महिना उलटूनही शाळेची दुरुस्ती रखडली; अंगणवाडी स्टेजवर, बालहक्क आयोगाची नाराजी

Morjim Beach Safety: मोरजी बीचवर गुरांचे कळप, भटक्या श्वानांचा उपद्रव; पर्यटन हंगामात पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न!

Ranji Trophy: गोव्याची फलंदाजी ठरतेय डोकेदुखी; विदर्भाविरुद्ध पराभवांची मालिका खंडित करण्याचे आव्हान

Rohit Sharma Dance Video: 'ले गई, ले गई' गाण्यावर रोहित शर्मानं धरला ठेका! करिश्मा कपूरसोबतचा डान्स व्हिडीओ व्हायरल; हिटमॅन म्हणाला, 'मजा आ गया'

SCROLL FOR NEXT