Masala Aloo Corn Chaat  Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Evening Snacks: आलू कॉर्न चॅट खावून गप्पांना येणार रंगत, अन् मित्रांची बसणार पंगत

आज तुम्ही मसाला आलू कॉर्न चॅट कस बनवायचं ते सांगणार आहोत.

दैनिक गोमन्तक

Masala Aloo Corn Chaat Recipe: जर तुम्ही तुमच्या मित्रांना घरी बोलावले असेल तर तुम्ही त्यांच्यासाठी काहीतरी खास, मसालेदार आणि मजेदार बनवू शकता. जुन्या किस्से काही चटपटीत खातांना आणखी खास होवू शकतात. गप्पांना रंगत येवू शकते. आणि मित्रांची पंगत बसू शकते. विकेंड मेमरेबल बनवण्यासोबतच तोंडाची चवही मस्त बनवा. आज तुम्ही मसाला आलू कॉर्न चॅट कस बनवायचं ते सांगणार आहोत.

मसाला आलू कॉर्न चाट बनवण्यासाठी साहित्य

2 उकडलेले बटाटे

1 बारीक चिरलेला कांदा

1 बारीक चिरलेला टोमॅटो

चिरलेली कोथिंबीर

2 कप उकडलेले कॉर्न

टीस्पून जिरे पावडर

टीस्पून चाट मसाला

टीस्पून काळे मीठ

1 टीस्पून लिंबाचा रस

टीस्पून लाल तिखट

बटर

मसाला आलू कॉर्न चॅट बनवण्याची पद्धत

मसाला आलू कॉर्न चाट बनवण्यासाठी प्रथम बटाटे आणि कॉर्न वेगळे उकळवा. उकडलेले बटाटे थंड झाल्यावर सोलून त्याचे तुकडे करा. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही चाटमध्ये न तळलेले बटाटे देखील वापरू शकता. याशिवाय ते सोनेरी होईपर्यंत तेलात तळून घ्या. जर तुम्ही बटाटे तळत असाल तर ते उकळण्याची गरज नाही. कणीस उकळताना पाण्यात मीठ नक्कीच घालावे.

आता एका भांड्यात तळलेले बटाटे आणि उकडलेले कॉर्न काढा. त्यात लाल तिखट, चाट मसाला, जिरेपूड, काळे मीठ, लोणी आणि मीठ घालून मिक्स करा. आता त्यात बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो आणि हिरवी कोथिंबीर घाला. त्यावर लिंबाचा रस पिळून घ्या. वरून हिरवी चटणी किंवा चिंचेची चटणीही मिक्स करू शकता. मुलांनाही ही डिश आवडते आणि ती कमी वेळात कोणीही सहज तयार करू शकते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Shubman Gill Century: शुभमन गिलचा धमाका! ठोकलं बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा ठरला पहिला भारतीय

Camel Tear: उंटाचे अश्रू सापाच्या विषावर गुणकारी, एक थेंब 26 सापांच्या विषावर ठरेल जालीम औषध; अभ्यासातून स्पष्ट

CO2 To Alcohol: विज्ञानाचा चमत्कार! कार्बनचे अल्कोहोलमध्ये रुपांतर करण्यात कोरियाच्या वैज्ञानिकांना यश

Anaya Bangar: 'पुरुषाच्या देहात एक कोमल स्त्री जगत होती'; अनाया बांगरने जागवल्या लिंगबदल काळातील नाजूक आठवणी

Goa Crime: पार्किंगचा वाद विकोपाला गेला, पर्ये सत्तरीत दोन तरुणांमध्ये तुंबळ हाणामारी; एकाला अटक

SCROLL FOR NEXT