Electric Car Tips Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Electric Car Tips: इलेक्ट्रिक कारची बॅटरी खराब झाल्यास मिळतात 'हे' संकेत,वेळीच घ्या काळजी

पण जसजशी बॅटरी खराब होऊ लागते, तसतशी चार्जिंगलाही जास्त वेळ लागतो आणि त्यांची रेंजही सतत कमी होऊ लागते.

Puja Bonkile

Electric Car Tips: देशात इलेक्ट्रिक वाहनांची विक्री सातत्याने वाढत आहे. यासोबतच त्यांच्या बॅटरीबाबतही अनेक प्रकारचे प्रश्न निर्माण होतात. इलेक्ट्रिक कार आणि SUV ची बॅटरी खराब होण्यापूर्वी कोणते संकेत मिळतात हे जाणून घेऊया.

बॅटरी खराब झाल्यावर मिळतात हे संकेत

नवीन इलेक्ट्रिक कार किंवा SUV ची बॅटरी चार्ज होण्यासाठी खूप कमी वेळ लागतो आणि तिची रेंजही खूप जास्त असते. पण जसजशी बॅटरी खराब होऊ लागते, तसतशी चार्जिंगलाही जास्त वेळ लागतो आणि त्यांची रेंजही सतत कमी होऊ लागते. त्यामुळे वाहन वारंवार चार्ज करावे लागते आणि चार्ज झाल्यानंतरही ते नवीन वाहनापेक्षा कमी अंतर कापू लागते.

ओव्हरचार्जिंगमुळे होऊ शकते खराब

इलेक्ट्रिक कार आणि एसयूव्हीला वारंवार चार्ज केले तर त्याचा बॅटरीवर नकारात्मक परिणाम होतो. इलेक्ट्रिक कार आणि SUV मध्ये ओव्हरचार्जिंगविरूद्ध सुरक्षा उपाय केले जात असले तरी वारंवार चार्जिंग केल्याने बॅटरी लवकर खराब होऊ शकते.

वातावरणाचा परिणाम

देशात काही ठिकाणी तापमान खूप कमी आहे तर काही ठिकाणी ते खूप जास्त आहे. यामुळे या भागात इलेक्ट्रिक वाहन वापरल्याने दीर्घकाळ बॅटरी खराब होण्याचा धोका वाढतो.

बॅटरीचे आयुष्य किती असते?

इलेक्ट्रिक कार आणि एसयूव्हीमध्ये मिळणाऱ्या बॅटरीचे आयुष्य जास्त असते . इलेक्ट्रिक कारमधील बॅटरीचे सरासरी आयुष्य आठ वर्षे किंवा त्याहून अधिक असते. तसेच तुमच्या वापरावर बॅटरीचे आयुष्य वाढू किंवा कमी होऊ शकते.

कंपन्यांकडून मिळते वॉरंटी

देशात उपलब्ध असलेल्या अनेक इलेक्ट्रिक कार आणि एसयूव्हीच्या बॅटरीवर कंपन्यांनी किमान आठ वर्षे किंवा दीड लाख किलोमीटरपर्यंतची वॉरंटी दिली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ro Ro Ferryboat: गोव्यात आणखी एका मार्गावर होणार 'रो रो फेरी' सुरु, किती असणार क्षमता? कधी होणार सुरु? जाणून घ्या..

''बान तू सायबा'', भूतनाथाला रानातून परत आणण्यासाठी भाविक जमणार; पेडण्यात भरणार 'पुनव उत्सव'

U19 Goa Cricket Team: गोवा संघाचा लागणार कस! विनू मांकड करंडक होणार सुरु; युवा क्रिकेटपटू चमक दाखवण्यासाठी सज्ज

Mapusa Market: पोर्तुगीज काळात उभारलेला, 1960 साली बांधलेला, आशियातील पहिला नियोजनबद्ध बाजार

IIT Project Goa: उद्या गोव्याच्या हातून 'आयआयटी' गेली तर..?

SCROLL FOR NEXT