Bread Pizza Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Bread Pizza बनवण्याची सोपी पद्धत

झटपट आणि स्वादिष्ट ब्रेड पिझ्झा बनवण्याची रेसिपी

दैनिक गोमन्तक

पिझ्झा (Pizza) अनेकांची आवडती डिश आहे. पण दररोज पिझ्झा खाणे आपल्या खिशाला भारी पडू शकते. यामुळे तुम्हाला जर शॉर्टकट स्टाइलमध्ये ब्रेड पिझ्झा बनवायचा असेल तर तुम्ही घरी सहज बनवू शकता. सर्वात महत्वाचे म्हणजे हा ब्रेड पिझ्झा (Bread Pizza) पटकन तयार होतो आणि तुम्हाला हवे तेव्हा ब्रेडचा वापर करून पिझ्झा बनवता येतो. चल तर मग जणू घेऊया ब्रेड पिझ्झाची बनवायची रेसिपी

* ब्रेड पिझ्झा बनवण्यासाठी साहित्य

  • व्हाइट ब्रेड- 4

  • मोझारेल चीज -100 ग्रॅम

  • कांदा - 1 बारीक चिरलेला

  • शिमला मिरची- 1 बारीक चिरलेली

  • टामतर - 1 बारीक चिरलेले

  • जॉलपेनो - 25 ग्रॅम

  • चिली फ्लेक्स - 1/2 टीस्पुन

  • ओरिगेनो - 1/2 टीस्पुन

  • शेजवान चटणी- 1 टीस्पुन

  • टोमॅटो केचअप - 2 चमचे

  • मीठ स्वादानुसार

* कृती

सर्वात पहिले ब्रेड गरम करून घ्यावी. नंतर एक बाऊलमध्ये बारीक चिरलेले टोमॅटो, कांदा, शिमला मिरची मिक्स करावे. यात नंतर चिली फ्लेक्स, मिक्स्ड हर्ब्स, ओरेगेनो आणि मीठ चांगले मिक्स करावे. पिझ्झा चटणी तयार करण्यासाठी एका भांड्यात टोमॅटो केचअप शेझवान चटणी आणि चिली फ्लेक्स मिक्स करावे. हे मिश्रण ब्रेडवर लावावे. त्यावर सर्व भाज्यांचे मिश्रण टाकावे. नंतर यावर चीज खीसून टाकावे. नंतर या ब्रेडच्या स्लाइस बेकिंग ट्रेमध्ये ठेवून ओव्हनमध्ये ठेवा किंवा तुम्ही तव्यावर देखील गरम करू शकता. 15 मिनिटानंतर ब्रेड बाहेर काढावी. तयार आहे तुमचा स्वादिष्ट ब्रेड पिझ्झा. यावर थोडे ऑर्गेनो टाकून गरम सर्व्ह करू शकता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

Viral Post: 'मला नवरा हवाय, पण माझ्या अटींवर...' तरूणीने 'Google Form'वरून घेतली मुलांची परीक्षा! 240 हून अधिक पोरांनी दाखवला इंटरेस्ट, प्रश्न वाचून व्हाल थक्क

Lucky Zodiac Signs: आर्थिक प्रगती आणि सुख-समृद्धीचे नवे योग! ऑक्टोबर महिन्यात 'हे' मोठे ग्रह बदलणार 4 राशींचे भविष्य, मिळणार बक्कळ पैसा

Son Appeal Rejected: वडिलांच्या मृत्युपत्राला आव्हान देणाऱ्या मुलाचे अपील फेटाळले; स्वतःच्या हिश्शाची जमीन मुलीला देण्याचा अधिकार कायम

KBC 18: पणजीतील 'पहिली चाहती' आजही संपर्कात; अमिताभ बच्चन यांच्या आठवणींनी रंगला 'केबीसी', अजित पुनियांनी जिंकले 12.5 लाख

SCROLL FOR NEXT