Coffee Side Effects  Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Coffee Side Effects : कॉफी प्या! पण अगोदर 'या' परिणामांकडे लक्ष द्या

गोमन्तक डिजिटल टीम

दिवसाची सुरुवात असो किंवा मूड फ्रेश करण्यासाठी असो अनेकांना कॉफी (Coffee) पिणं आवडतं. अनेकांना तर कॉफीची इतकी सवय असते की एक दिवस कॉफी न प्यायल्यास त्यांचा दिवसच खराब जातो.

योग्य प्रमाणात कॉफीचं सेवन शरीरासाठी चांगलं आहे. पण हे लक्षात ठेवलं पाहिजे की कोणत्याही गोष्टीचा अतिरेक वाईट ठरतो. कॉफीचं जास्त प्रमाणात सेवन केल्यास त्याचा तुमच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. जास्त प्रमाणात कॉफीचं सेवन केल्यामुळे शरीरात कोलेस्ट्रॉल वाढून अनेक गंभीर आजारांना आमंत्रण मिळेल.

रिकाम्या पोटी कॉफीचे सेवन केल्याने शरीरातील कोर्टिसोल हार्मोन म्हणजेच स्ट्रेस हार्मोनची पातळी वाढते. यामुळे स्त्रियांच्या प्रजननाच्या क्षमतेवर वजन आणि हार्मोन्सवर वाईट परिणाम होण्याची शक्यता असते.

शरीरात स्ट्रेस हार्मोन्सची पातळी सकाळी जास्त आणि संध्याकाळी कमी असते. त्यामुळे, जेव्हा तुम्ही सकाळी सर्वात आधी कॅफिनचे सेवन करता तेव्हा कोर्टिसोलची पातळी कमी होते.

कोर्टिसोल हार्मोन आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर असतात. त्यामुळे ते नियंत्रणात राहणं गरजेचं आहे.

तुम्ही जर रोज जास्त प्रमाणात कॉफी प्यायल्यात तर त्यामुळे आरोग्यासंबंधित समस्या निर्माण होऊ शकतात. कॉफीमध्ये जास्त प्रमाणात कॅफीन असते. त्यामुळे याचं अधिक सेवन केल्यास शरीरात कोलेस्टेरॉल वाढते, ऍसिडिटीचा त्रास होऊ शकतो, शरीरात उष्णता वाढू लागते आणि हे अनेक गंभीर आजारांसाठी कारणीभूत ठरतं.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime News: गोव्यातील धक्कादायक प्रकार! एका भावाकडून दुसऱ्या भावाच्या होणाऱ्या बायकोचा लैंगिक छळ

Mhadei Water Dispute: ‘म्‍हादई’च्‍या मुद्यावरून काँग्रेस व भाजपमध्‍ये 'तू तू - मैं मैं'

Rarest Birds in World: जगातील 'हे' दुर्मिळ पक्षी नामशेष होण्याच्या वाटेवर; जाणून घ्या

२१ कुटुंबे नव्या घरात करणार गणरायाचे स्वागत! राणे दाम्पत्यामुळे गणेशोत्सव ठरणार खास

भारतीयांना दिवसाला प्राप्त होतात 12 फसवे मेसेज; आतापर्यंत 93,000 हून अधिक टेलिकॉम स्कॅम!

SCROLL FOR NEXT