Does Smoking Reduce Stress Or Increase It
आजच्या धकाधकीच्या आयुष्यात खराब जीवनशैलीमुळे लोकांचे मानसिक आरोग्य बिघडत चालले आहे. ऑफिसमधील ताण आणि वैयक्तिक आयुष्यातील समस्यांमुळे लोकांचे मानसिक आरोग्य बिघडत आहे. ऑफिसमध्ये काम करणारे बरेच लोक मानसिक ताण कमी करण्यासाठी सिगारेट ओढतात. पण सिगारेट ओढल्याने खरोखरच मानसिक ताण कमी होतो का? चला तर मग याबद्दल सविस्तररित्या जाणून घेऊया...
दरम्यान, सिगारेटमध्ये निकोटीन असते, जे मेंदूवर परिणाम करते. जेव्हा एखादी व्यक्ती सिगारेट ओढते तेव्हा निकोटीन शरीरात डोपामाइन (एक हार्मोन) सोडते, ज्यामुळे लोकांना आनंद आणि आराम मिळतो. म्हणूनच सिगारेट ओढल्यानंतर काही क्षणांसाठी व्यक्तीला बरे वाटते. पण निकोटीनचा प्रभाव कमी होताच, व्यक्तीला पुन्हा अस्वस्थता आणि मानसिक ताण जाणवू लागतो.
दिल्लीतील मानसोपचारतज्ज्ञ डॉ. आस्तिक जोशी यांनी सांगितले की, सिगारेट ओढल्याने काही काळ बरे वाटते, परंतु ते आरोग्यासाठी (Health) हानिकारक आहे. सिगारेट ओढण्याच्या सवयीमुळे हळूहळू मानसिक ताण वाढू शकतो. कारण निकोटीनचे दीर्घकाळ सेवन केल्याने शरीरातील हार्मोनल संतुलन बिघडू शकते, ज्यामुळे चिंता आणि नैराश्याची समस्या अधिक गंभीर होऊ शकते.
डॉ. जोशी यांनी पुढे सांगितले की, दीर्घकाळापासून धूम्रपान करणाऱ्या व्यक्तीला धूम्रपान सोडणे सोपे नसते, कारण सिगारेटमध्ये असलेले निकोटीनची सवय लागते. जर एखाद्या व्यक्तीने सिगारेट सोडण्याचा प्रयत्न केला तर शरीरात निकोटीनची कमतरता निर्माण होते. यामुळे चिडचिड, राग आणि इतर अनेक लक्षणे दिसू लागतात. अशा परिस्थितीत, व्यक्ती इच्छा असूनही धूम्रपान सोडू शकत नाही.
चालणे किंवा कोणतीही शारीरिक हालचाल करा.
खोल श्वास घेण्याच्या व्यायामामुळे मानसिक ताण (Mental Stress) कमी होतो.
झोपण्याची आणि उठण्याची वेळ निश्चित करा.
चांगली झोप घ्या.
मित्र आणि कुटुंबासह गप्पा मारा.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.