Diwali Skin Care Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Diwali Skin Care: दिवाळीच्या साफसफाइत त्वचा खराब झालीय? मग चेहऱ्याचा डलनेस कमी करेल हे फेसपॅक

चेहऱ्यावर चमक कायम ठेवायची असेल तर तुम्ही पुढील टिप्स फॉलो करू शकता.

Puja Bonkile

Diwali Skin Care: दिवाळीत साफसफाई करताना लोकांच्या त्वचेवर धूळ आणि घाण जमा होते. अशावेळी दिवाळी चेहऱ्यावर डलनेस येतो आणि त्वचा कोरडी पडते. दिवाळीच्या दिवशी तुम्हाला ग्लोइंग आणि गोरी त्वचा हवी असेल तर तुम्ही हे फेस पॅक घरीच लावू शकता. इन्स्टंट ग्लोसाठी हा फेस पॅक खूप चांगला आहे. हे लावल्याने तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावर अप्रतिम चमक दिसेल. तुम्हाला दिवाळीत त्वचेची काळजी घेण्यासाठी पुढील घरगुती उपाय मदत करतील.

  • घरघुती फेसपॅक

मध आणि लिंबु


​​चमकदार आणि फेअर त्वचेसाठी तुम्ही मध आणि लिंबाचा बनवलेला फेस पॅक चेहऱ्यावर लावू शकता. यामध्ये असलेले गुणधर्म चेहऱ्यावर त्वरित चमक आणु शकतात. हे करण्यासाठी 1 चमचे मधात लिंबाच्या रसाचे काही थेंब मिक्स करावे. नीट मिसळल्यानंतर चेहऱ्यावर लावावे. 20 मिनिटांनतर चेहरा स्वच्छ धुवावा.

मुलतानी माती आणि दही


दही आणि मुलतानी माती मिक्स करून घरगुती फेस पॅक देखील तयार करू शकता. यासाठी एका लहान भांड्यात साधारण 2-3 चमचे मुलतानी माती मिक्स करावी. त्याची पेस्ट तयार करा आणि चेहऱ्यावर लावा आणि सुमारे 20 मिनिटांनी चेहरा स्वच्छ पाण्याने धुवावा. यामुळे त्वचेवर चमक येईल.

लिंबू आणि बेसन


एका भांड्यात एक चमचा बेसन घ्यावा आणि त्यात लिंबाचा रस घालावा आणि मिक्स करावा. तयार केलेली पेस्ट चेहऱ्यावर लावावी आणि 20-25 मिनिटांनी चेहरा स्वच्छ पाण्याने धुवावा. लिंबू आणि बेसनामध्ये असलेले गुणधर्म त्वचेवर त्वरित चमक आणतात. हा फेस पॅक मुरुम आणि डाग कमी करण्यासाठी देखील उपयुक्त आहे.

कॉफी आणि दही


तुम्ही कॉफीमध्ये दही मिक्स करून त्वचेवर लावू शकता. हा फेस पॅक चेहऱ्यासाठी खूप चांगला आहे. तुम्ही दिवाळीच्या एक दिवस आधी किंवा दिवाळीच्या दिवशी हे पॅक चेगऱ्यावर लावु शकता. हा फेस पॅक बनवण्यासाठी 2 चमचे कॉफी पावडरमध्ये 1 चमचे दही मिक्स करावा आणि पेस्ट बनवावी. ते मिक्स करून चेहऱ्यावर लावा आणि 20 मिनिटांनी चेहरा पाण्याने धुवावा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

St Estevam: संतापजनक! आठवीत शिकणाऱ्या 10 मुलांना वळ उठेपर्यंत मारहाण, सांतइस्तेव येथील शिक्षिकेवर गुन्हा दाखल

Goa Politics: 'एसटींसोबत रक्‍ताचे नाते सांगणारे आले अन् गेले'; मुख्‍यमंत्री, सभापतींकडून गावडेंवर खोचक ‘बाण’

Monsoon Trip Goa: मान्सूनमध्ये गोव्यात कुठली 'ऑफबीट' ठिकाणं एक्सप्लोर कराल? वाचा खास टिप्स

Rashi Bhavishya 04 July 2025: प्रवासाचे योग, सामाजिक मान मिळेल; महत्वाची व्यक्ती भेटेल

Acid Attack Goa: 'त्याच्या' आईनेच आत्महत्येस प्रवृत्त केलं... अ‍ॅसिड हल्ल्याप्रकरणी मृत मुलीच्या आईचा खळबळजनक आरोप

SCROLL FOR NEXT