Diwali Shopping Tips Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Diwali Shopping Tips: दिवाळी शॉपिंगसाठी मार्केटला जाताय? मग 'या' गोष्टी ठेवा लक्षात

तुम्हीही दिवाळी शॉपिंगसाठी मार्केटमध्ये जात असाल तर काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत.

Puja Bonkile

Diwali Shopping Tips: दरवर्षीप्रमाणे यंदाही दिवाळीचा सण मोठ्या थाटामाटात साजरा करण्यासाठी लोक सज्ज झाले आहेत. अवघ्या काही दिवसांवर दिवाळी येऊन ठेपली आहे. या दिवशी सर्वत्र दिवे लावले जातात, लोक एकमेकांना शुभेच्छा देतात आणि फटाके फोडून हा सण मोठ्या थाटामाटात साजरा करतात. दुसरीकडे, दिवाळी खरेदीला सुरूवात आधीच झाली आहे. दिवाळी खरेदीसाठी लोक मार्केटला जातात. या ठिकाणी काही गोष्टींची विशेष काळजी घ्यावी. अन्यथा तुमचेही मोठे नुकसान होऊ शकते.

  • लहान मुलांना सोबत नेऊ नका

तुम्ही दिवाळीच्या खरेदीसाठी मार्केटमध्ये जात असाल तर लक्षात ठेवा लहान मुलांना सोबत घेऊन जावू नका. मार्केटमध्ये खूप गर्दी असते, त्यामुळे मुले हरवण्याची भीती असते. म्हणून, शक्य असल्यास मुलांना घरी ठेवावे.

  • फसवणुकीपासून सावध

तुम्ही मार्केटमध्ये वस्तुंची खरेदी करतांना सावधगिरी बाळगली पाहिजे. कारण दिवाळी दरम्यान अनेक लोक फसवणुकीला बळी पडतात. यामुळे कोणतीही वस्तु खराब किंवा कुठे डॅमेज नसेल याची काळजी घ्यावी.

  • मोबाईलची काळजी घ्या

तुम्ही मार्केटमध्ये शॉपिंगसाठी जात असाल तर मोबाइलची काळजी घ्यावी. कारण गर्दीमध्ये तुमचा मोबाइल कोणीही चोरू शकतो. यामुळे गर्दीच्या ठिकाणी मोबाइल सांभाळून ठेवावा.

  • आधीच करू शकता खरेदी

दिवाळीच्या खरेदीसाठी अनेकजण दिवाळीच्या आसपासचे दिवस निवडतात. अशावेळी मार्केटमध्ये गर्दी असते आणि खरेदीही व्यवस्थित होत नाही.  तुम्ही दिवाळीची खरेदी काही दिवस अगोदर करू शकता. यामुळे तुम्हाला गर्दीचा त्रास होणार नाही.

  • मौल्यवान गोष्टी जपा

जर तुम्ही मार्केटमध्ये दिवाळी शॉपिंगसाठी जात असाल तर सोन्याचे दागिने घालु नका. कारण गर्दीत तुमचे दागिने चोरीला जावु शकते. यामुळे शक्य असल्यास सोन्याचे दागिने घालणे टाळावे. तुम्ही आर्टिफिअल दागिने घालु शकता.

  • पैसे सुरक्षित ठेवा

जर तुम्ही मार्केटमध्ये रोख रक्कम घेऊन जात असाल तर ते सुरक्षितपणे ठेवावे. कारण अशावेळी लोकांचा खिसाही कापला जातो. त्यामुळे शक्य असल्यास तुम्ही रोख रकमेऐवजी ऑनलाइन पेमेंट करू शकता आणि तुमच्याकडे असलेली थोडीशी रक्कम सुरक्षित ठेवू शकता. महिलांनीही आपल्या पर्सची काळजी घ्यावी.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT