Diwali Decoration Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Diwali Decoration: दिवाळीत घराला सिंपल लाईटिंगने करा सुंदर सजावट

यंदा दिवाळीत घराला खास सजावट करण्यासाठी फॉलो पुढील टिप्स फॉलो करा.

Puja Bonkile

Diwali Decoration: दिवाळी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. यंदा 12 नोव्हेंबरला दिवाळी साजरी केली जाणार आहे. यंदा धनत्रयोदशी 10 नोव्हेंबरला साजरी केली जाणार आहे. या दिवसापासून दिवाळी साजरी केली जाते. भारतात काही दिवसांपुर्वीच दिवाळीची जय्यत तयारी सुरू होते. प्रत्येक घरात स्वच्छता आणि घराची सजावटीला सुरूवात होते.

अनेक लोक दिवाळीपुर्वी घराला लाइटिंगने सजावट करतात. दिवाळीत प्रत्येक रस्ते आणि परिसर नव्यावधुप्रमाणे सजलेले दिसते. पण अशी अनेक घरे आहेत जी पैशाअभावी आपले घर व्यवस्थित सजवू शकत नाहीत. आजकाल बाजारात अधिकाधिक लाइटिंग उपलब्ध आहेत. परंतु आपण ते विकत घेऊ शकत नसाल तर काळजी करू नका. कारण घरातील जुन्या आणि साध्या लाइटिंगचा वापर करून तुम्ही घराची सुंदर सजावट करू शकता. 

  • अशा प्रकारे करा लाइटिंगचा वापर

यंदा दिवाळीत तुमच्या घराला एक वेगळा लूक द्यायचा असेल तर सर्वात पहिले तुम्हाला लांब लाइटिंग घ्यावी लागेल. नंतर लाइटिंगचा थोडा थोडा भाग घराच्या आकारानुसार आणि उंचीनुसार लावु शकता. अशी लाइटिंग तुमच्या घराला हटके लुक देईल.

घराची बॉर्डर

जर तुम्ही दिवाळीच घराची साजवट करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही भिंतींच्या बॉर्डरवर देखील लाइटिंग टाकु शकता. अशा प्रकारे घर सजवणं थोडं कठीण असेल, पण तुमचं घर अधिक सुंदर दिसेल.

झाडांवर लाइटिंग टाकावी

जर तुमच्या घराबाहेर झाड असेल तर ही तुमच्यासाठी सर्वात चांगली गोष्ट आहे. कारण झाडांवर लाइटिंग लावल्यानंतर घराचा लूक आणखी छान दिसतो. रात्रीच्या वेळी हिरव्यागार झाडांवर लाइटिंगचा मंद प्रकाश खुप आकर्षक वाटतो. घराबाहेर अशा प्रकारची सजावट केल्याने तुमच्या घराकडे सर्वांचे लक्ष नक्कीच जाईल. 

गोलाकार लाइटिंगचा वापर

जर तुमचे घर मोठे असेल तर अशा प्रकारची डिझाईन तुम्हाला खूप छान लुक देईल. परंतु अशा प्रकारच्या सजावटीसाठी तुम्हाला भरपूर लाइटिंग लागतील. अशा प्रकारे घर सजवणे खूप सोपे आहे. 

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

"Indian Dog Go Back" ओरडत 22 वर्षीय शीख तरुणावर जीवघेणा हल्ला; ऑस्ट्रेलियात वर्णद्वेषी नराधमांचा नंगा नाच

आघाडीपटू नेमिल याच्या खांद्यावर आक्रमणाची धुरा, FC GOAचे प्रशिक्षक मार्केझ नवोदितावर खूश

Shani Gochar 2026: नोकरीत प्रमोशन, व्यवसायात अमाप नफा अन् शत्रूंची उडणार दाणादाण; 'या' 3 राशींवर शनिदेवाची कृपा

Goa Crime: म्हापसा हादरलं! अपार्टमेंटजवळ अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळल्यानं खळबळ; मृत्यूचं कारण अद्याप गुलदस्त्यात

Rajpal Yadav: विमानतळाप्रमाणे जेलमध्येही हवा 'स्मोकिंग झोन', तिहार तुरुंगातून बाहेर येताच राजपाल यादवची अजब मागणी; काय म्हणाला नेमका?

SCROLL FOR NEXT